म्हापसा : एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप असलेले तहलका नियतकालिकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्या विरुद्धची सुनावणी उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी स्थगित केली आहे. त्यावरील पुढील सुनावणी ९ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.२८ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सुनावणी स्थगित ठेवून पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी ठेवली होती. झालेल्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात तेजपाल याने केलेल्या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असल्याने पुन्हा सुनावणी स्थगित करण्यात आली. आज झालेल्या सुनावणीवेळी तेजपाल न्यायालयात उपस्थित नव्हता. आजारी असल्याने अनुपस्थित राहण्यास मुभा मागणारा अर्ज त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात केलेला. केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. या संबंधीची माहिती तेजपालचे वकिल अॅड. राजीव गोम्स यांनी पत्रकारांना दिली.आपल्या सहकारी कनिष्ठ महिला पत्रकारा विरुद्ध कथित लैंगिक छळ प्रकरणात तहलका नियतकालिकाचा संपादक तरुण तेजपाल विरूद्ध तीन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रावरील आरोप उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्या. विजया पोळ यांच्या न्यायालयात २८ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आले होते. भादसंच्या कलम ३४१, ३४२, ३५४, ३५४ (ए), ३५४ (बी), ३७६, ३७६ (२)(एफ), ३७६ (२) (के) या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आलेले. केलेले आरोप त्यावेळी तेजपालच्या वतिने फेटाळण्यात आले होते व केलेले आरोप चुकीचे असून ते राजकीय हेतूने प्ररित असल्याचा आरोपही तेजपालच्या वकिलाने न्यायालयात केलेला.२०१३ साली एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिलेवर तेजपाल यांनी केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रांच) तेजपाल विरोधात १७ फेब्रुवारी २०१४ साली विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सुमारे ७९ दिवसांत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात १५० साक्षीदार नोंद करण्यात आलेले. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसात त्याला जामीनही मंजूर करण्यात आलेला.
तरुण तेजपाल प्रकरणी पुढील सुनावणी उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 6:54 PM
म्हापसा : एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप असलेले तहलका नियतकालिकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्या विरुद्धची सुनावणी उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी स्थगित केली आहे. त्यावरील पुढील सुनावणी ९ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.२८ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सुनावणी स्थगित ठेवून ...
ठळक मुद्देपुढील सुनावणी ९ जानेवारी २०१८ रोजी होणार महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सुनावणीवेळी तेजपाल न्यायालयात उपस्थित नव्हता