तरूणांची गाव सुरक्षा
By admin | Published: December 20, 2015 11:59 PM
चिचोंडी पाटील : स्मृती युवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
चिचोंडी पाटील : स्मृती युवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम अहमदनगर : चिचोंडी पाटील येथे वाढत्या चोर्यांमुळे ग्रामस्थांत दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून स्मृती युवा प्रतिष्ठानने गस्तीचे नियोजन केले आहे. मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष अशोक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले. यात मंडळाच्या ८०-८५ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. त्यात रोज १३ कार्यकर्ते या प्रमाणे नियोजन करण्यात आले. त्यात शनिवारी गस्तीसाठी उपस्थित असलेले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश ठोंबरे, सतीश शेळके, अनिल डोखडे, अशोक चोभे,संभाजी डोखडे,भाऊसाहेब ठोंबरे,प्रकाश खडके साहेब,दिलीप सुरवसे साहेब,चंद्रकांत कोकाटे,गणेश डोखडे,गडाख आदी उपस्थित होते.---------गतिरोधकासाठी गांधीगिरीअहमदनगर : नगर- जामखेड महामार्गावर चिचोंडी पाटील गावच्या हद्दीत गतिरोधकवर पांढरे पट्टे न राहिल्याने वाहनांना गतिरोधक लक्षात येत नाहीत, तसेच रस्त्यालगत असणार्या म्हसोबा मंदिराजवळ वळण दर्शक फलक नाही. त्यामुळे दररोज अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ माजी पंचायत समिती सदस्य सुधीर भद्रे, अशोक कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली गतिरोधकाला हार घालून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले याप्रसंगी मा. ग्रा.पं.सदस्य राजेंद्र कोकाटे, राजू कोकाटे, राजेंद्र इंगळे ,प्रकाश ठोबरे,संदीप काळे,भारत कोकाटे,अक्षय परकाळे,संतोष कैदके,मारु ती सांगळे,श्रीकांत कराळे,वैभव कोकाटे,सचिन खडके उपस्थित होते.