शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

ऑक्सिजन वाटपासाठी कोर्टाने नेमला टास्क फोर्स, वैज्ञानिक, न्याय्य पद्धतीने वितरणाचा हेतू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 1:32 AM

केंद्र सरकारकडून राज्यांसाठी केलेल्या ऑक्सिजनचे वाटप नव्याने करावे, असे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट करताना टास्क फोर्सची स्थापना करण्याचा आदेश दिला.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने देशभरात सर्वत्र वैज्ञानिक, तर्कसंगत आणि न्यायसंगत पद्धतीने ऑक्सिजनचे वाटप व्हावे यासाठी १२ सदस्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय टास्क फोर्स नियुक्त केला आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांनी चर्चेअंती टास्क फोर्समधील सदस्यांची नावे निश्चित केली. कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनसोबत इतर औषधे नीटपणे मिळत आहेत की नाही, यावरही टास्क फोर्स लक्ष ठेवणार आहे. आठवडाभरात हा टास्क फोर्स काम करू लागेल. (The task force appointed by the court for oxygen distribution is aimed at scientific, equitable distribution)

केंद्र सरकारकडून राज्यांसाठी केलेल्या ऑक्सिजनचे वाटप नव्याने करावे, असे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट करताना टास्क फोर्सची स्थापना करण्याचा आदेश दिला. याबाबत निर्णय देताना कोर्टाने म्हटले आहे की, या महामारीच्या भीषण संकटाला तोंड देताना देशातील आघाडीच्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सने केलेल्या महत्त्वाच्या सूचनांमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षमपणे काम करू शकेल. टास्क फोर्समुळे जाणकार मंडळी एकत्र येऊन या संकटावर मात करण्यासाठी शास्त्रशुद्ध रणनीती आखू शकतील. या टास्क फोर्सचा अहवाल केंद्र सरकार आणि कोर्टाला पाठविला जाईल.

मुंबईतील दोन डॉक्टरांची निवडया १२ जणांच्या टास्क फोर्समध्ये मुंबईतील फोर्टिस रुग्णालयातील क्रिटिकल केअर मेडिसिन अँड आयसीयूचे संचालक डॉ. राहुल पंडित आणि हिंदुजा रुग्णालयातील कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन डॉ. झरीर एफ. उदवाडिया यांचा समावेश करण्यात आला आहे.

टास्क फोर्समध्ये मुंबईतील दोन डाॅक्टर१२ जणांच्या टास्क फोर्समध्ये मुंबईतील डॉ. राहुल पंडित आणि डॉ. झरीर एफ. उदवाडिया यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. राहुल पंडित हे दोन दशकांहून अधिक काळ अतिदक्षता विभागाचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात क्रिटिकल केअर मेडिसिन आणि अतिदक्षता विभागाचे संचालक आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जॉइंट फॅकल्टी ऑफ इंटेन्सिव्ह केअर मेडिसिन ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली आहे. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे ते उपाध्यक्षही आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाकाळात राज्याच्या कोरोना टास्क फोर्समध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डॉ. झरीर उदवाडिया हे वरिष्ठ छातीविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. उदवाडिया हे एफसीसीपी (अमेरिका), एफआरसीपी (लंडन) आणि हिंदुजा रुग्णालयांशी संलग्न आहेत. क्षयरोग, न्यूमोनिया, अस्थमा, ब्राँकॉस्कॉपी, झोपेचे विकार, सार्कोइडोसिस या वैद्यकीय आजार शाखेत निष्णात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १७० हून अधिक वैद्यकीय संशोधन जर्नलमध्ये त्यांचे अहवाल प्रकाशित झाले आहेत. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCourtन्यायालय