नवी दिल्ली : २०१८-१९ या आर्थिक वर्षात भाजपला ७०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यातील निम्मी म्हणजे ३५६ कोटी रुपये इतकी रक्कम टाटा ग्रुपच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्ट्रोरल ट्रस्टकडून भाजपला मिळाली आहे.देणग्यांची माहिती भाजपने निवडणूक आयोगाला सादर केली. प्रुडंट इलेक्ट्रोरल ट्रस्टकडून भाजपला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ५४.२५ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. प्रुडंट इलेक्ट्रोरल ट्रस्टला भारती ग्रुप, हिरो मोटोकॉर्प, ज्युबिलंट फुडवर्क्स, ओरिएंट सिमेंट, डीएलएफ, जेके टायर्स आदी कंपन्यांचे भक्कम पाठबळ आहे. आॅनलाईन किंवा चेकद्वारे मिळालेल्या वीस हजार किंवा त्यापुढील रकमेच्या देणग्यांचा तपशील व देणगीदारांची नावे राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या रकमेचा यात समावेश नाही. भाजपला व्यक्ती, कंपन्या, निवडणुकांशी संबंधित ट्रस्ट यांच्याकडून देणग्या मिळाल्या आहेत.
टाटा ग्रुपकडून भाजपला ३५६ कोटींची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 4:10 AM