Tata Steel Plant Blast Latest Update: झारखंडच्या जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट इतका भयंकर होता की त्यानंतर प्लांटमध्ये आगीचे लोट उठताना दिसत आहेत. प्लांटमध्ये मोठी आग लागली असून अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तातडीनं या घटनेची माहिती घेतली असून बचावकार्याचे आदेश दिले आहेत.
टाटा स्टीलचा जमशेदपूर येथील हा प्लांट कंपनीच्या महत्वाच्या प्लांटपैकी एक मोठा प्लांट आहे. स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. "जमशेदपूर प्लांटमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासन, टाटा स्टीलचे व्यवस्थापक यांच्यासोब सामंजस्यानं जखमींवर तातडीनं उपचार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे", असं ट्विट हेमंत सोरेन यांनी केलं आहे.