शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

IPS होण्याचे स्वप्न पाहिलं पण टॅटूने केला घात; ‘ती’ गोष्ट समजताच तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 2:42 PM

UPSC ची तयारी करत असताना एक दिवस IPS चा टॅटू काढला होता.

टॅटू एखाद्याच्या मृत्यूचं कारण बनू शकतो असं जर कोणी सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूमागे टॅटूच कारण बनले. कारण UPSC ची तयारी करत असताना त्याने एक दिवस IPS चा टॅटू काढला होता. तेव्हा एका मित्राने सांगितले की, आता तू कितीही मेहनत केलीस किंवा परीक्षा उत्तीर्ण झालास तरी फायनल सिलेक्शनमध्ये तुझी निवड केली जाणार नाही. कारण तो टॅटू काढला आहेस. 

लखनौ येथील अभिषेक गौतम या तरुणाने टॅटूमुळे आत्महत्या केल्याने त्याचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्याच्या आत्महत्येनंतर दोन वर्षांनी अभिषेकच्या कुटुंबीयांनी दिल्लीत त्याच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. आयपीएस होण्याचे अभिषेकचे स्वप्न होते. त्याने मनाशी ठरवले होते की 2021 मध्ये तो UPSC परीक्षा उत्तीर्ण होईल आणि IPS होईल. अभ्यासावर भर दिला. आपल्या खोलीत अनेक प्रसिद्ध आयपीएस अधिकाऱ्यांचे फोटोही लावले. रात्रंदिवस स्वप्नाचा पाठलाग करत अभिषेकने एक दिवस हातावर IPS टॅटू बनवला. 

दुसर्‍याच दिवशी त्याने त्याचा मित्र ललित मिश्रा याला टॅटू दाखवला.मित्राने टॅटू पाहिल्यावर हे तू काय केलंस, आता परीक्षा पास झाल्यावरही तू सिलेक्ट होऊ शकणार नाही असं म्हटलं. अभिषेकचे वडील ब्रजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ललितशी बोलल्यानंतर अभिषेक अस्वस्थ झाला. गुगलवर टॅटूमुळे निवड करताना येणाऱ्या आव्हानांची माहितीही त्याने शोधली आणि टॅटू हटवण्याचे तंत्र, शक्यता आणि खर्चही शोधला. त्यानंतर हतबल झालेल्या अभिषेकने टोकाचा निर्णय घेतला. 

अभिषेकच्या कुटुंबीयांनी त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात हत्येच्या कटाचा कोणताही सुगावा पोलिसांना मिळालेला नाही. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांची पॉलीग्राफी चाचणीही करण्यात आली. काहीही चुकीचे आढळले नाही. अभिषेकने टॅटू काढल्यानंतर त्यांच्या फोनवर गुगल सर्च केल्याबद्दल कुटुंबीयांनीही न्यायालयाला माहिती दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"