बंगळुरू : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथोरिटी आॅफ इंडिया (ट्राय) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून इथिकल हॅकर्सनी त्यांची १४ प्रकारची माहिती लीक केली आहे. एवढेच नव्हे, त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून, त्यापैकी एका खात्यात आधारशी संलग्न पेमेंट सर्व्हिसमधून त्यांनी एक रुपयाही जमा केला आहे. त्यामुळे स्वत:चा आधार क्रमांक जाहीर करून, तो किती सुरक्षित आहे, असे सांगण्याचा आर. एस. शर्मा यांच्या भलताच अंगाशी आला आहे. शिवाय आधारच्या सुरक्षिततेविषयीचा दावाही पूर्णत: फोल ठरला आहे.हॅकर्सनी आपण एक रुपया शर्मा यांच्या बँक खात्यात एक रुपया जमा केल्याचा दावा ट्विटरववरून करताना पुरावा त्याचा स्क्रीनश़ॉटही त्याला जोडला आहे. शिवाय शर्मा यांच्या खात्यात पैसे जमा केल्याचा ट्रॅन्झॅक्शन आयडी नंबरही त्यांनी पोस्ट केला आहे. इथिकल हॅकर्समधून ओळखल्या जाणाऱ्या एलियन एल्डरसन, पुष्पेंद्र सिंह, कनिष्क सजनानी, अनिवर अरविंद आणि करण सैनी यांनी आतापर्यंत शर्मा यांची १४ प्रकारची माहिती लीक झाल्याचा दावा केला आहे. त्या डेटामध्ये ट्रायच्या प्रमुखांच्या घराचा पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, पॅनकार्ड क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांकाचा समावेश आहे.आर. एस. शर्मा यांनी आपला आधार क्रमांक जाहीर केल्यानंतर काही मिनिटांतच एल्डर्सन यांनी शर्मा यांचा पत्ता, आधार कार्डसोबत जोडण्यात आलेला मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मदिनांक व त्यांचे व्हॉट्सअॅपवर असलेली छायाचित्रेही सार्वजनिक केली होती. मात्र या माहितीचा कोणी दुरुपयोग करू नये, यासाठी ती स्पष्ट दिसणार नाही, याची काळजी घेतली होती. (वृत्तसंस्था)पंतप्रधान मोदींना आव्हानशर्मा यांची गोपनीय माहिती उघड केल्यानंतर एल्डरसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा १२ अंकी आधार क्रमांक सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले आहे. अर्थात पंतप्रधान तसे करण्याची अजिबात शक्यता आही.शर्मा यांचा डेटा हॅक झालेला नाही, त्यांची सर्वांना माहीत असलेली माहितीच दाखवून, आम्ही हा डेटा हॅक केला, असा दावा हॅकर्स करीत आहे, असे आधारने म्हटले आहे.
ट्रायच्या प्रमुखांच्या खात्यात हॅकर्सनी जमा केला रुपया!; आधार सुरक्षिततेचा दावा पोकळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 6:02 AM