लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : क्षयराेगासारख्या आजाराचे जेवढे लवकर निदान, तेवढे लवकर उपचार करून बरे हाेण्याची शक्यता वाढते. क्षयराेगाचे निदान आता आणखी साेपे आणि स्वस्त हाेणार आहे. भारतीय वैद्यकीय संशाेधन परिषदेने (आयसीएमआर) केवळ ३५ रुपयांमध्ये रुग्णाच्या केवळ लाळेची तपासणी करून निदान करण्याची नवी आणि साेपी पद्धती विकसित केली आहे.
आयसीएमआरच्या डिब्रुगड येथील प्रयाेगशाळेने ही नवी पद्धती विकसित केली आहे. त्यात तीन प्रकारे तपासणी केली जाते. सुमारे अडीच तासांमध्ये १,५०० पेक्षा जास्त नमुने एकाच वेळी तपासले जाऊ शकतात. सध्याच्या पारंपरिक पद्धतीनुसार, क्षयराेग नसल्याचे खात्रीदायक निदान हाेण्यासाठी ४२ दिवस लागतात.
कशी काम करते नवी पद्धत?‘क्रिस्पर-सीएएस१२ए’ वर रेणूवर आधारित ‘ग्लाे टीबीपीसीआर किट’ बनविण्यात आली आहे. त्यात रॅपिडग्लाे उपकरणाचीही मदत घेण्यात येईल. ही एक पाेर्टेबल किट असून त्यात तीन टप्प्यांमध्ये चाचणी केली जाते. याद्वारे झटपट निदान करता येणार आहे.
आजही क्षयराेगाचे जगासमाेर आव्हान- क्षयराेग हा आजच्या घडीलादेखील जागतिक आराेग्यासमाेर माेठे आव्हान आहे. त्यावर नियंत्रणासाठी वेगवान निदानाची गरज आहे. - सध्याच्या निदान पद्धतीद्वारे आजार ओळखण्यास बराच वेळ लागताे आणि महाग आहे. - ५०० ते ७ हजार रुपयांपर्यंत खर्च वेगवेगळ्या चाचणी पद्धतींनुसार तपासणीसाठी येताे.- ही पद्धत बाजारात उपलब्ध करण्यासाठी लवकरच पात्र कंपन्यांसाठी कंपन्यांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले आहेत.- आयसीएमआर आणि सहयाेगी कंपनीमध्ये आपसी सहयाेगातून संस्था आपल्या अनुभवी शास्त्रज्ञांच्या मदतीने तांत्रिक सहकार्य करेल.