संसदेत राहुल गांधी आक्रमक, मॉब लिंचिंगवरुन सरकारला विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 12:57 PM2018-07-23T12:57:08+5:302018-07-23T13:33:23+5:30

संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र,

TDP confusion outside the Parliament, shroud from Mob Linching in the hall | संसदेत राहुल गांधी आक्रमक, मॉब लिंचिंगवरुन सरकारला विचारला प्रश्न

संसदेत राहुल गांधी आक्रमक, मॉब लिंचिंगवरुन सरकारला विचारला प्रश्न

Next

नवी दिल्ली - संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावेळी राहुल गांधींनी केलेले भाषण देशभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र, एनडीएने 325 मते घेऊन विश्वासदर्शक ठराव जिंकला. तरीही सत्ताधारी मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आजही संसेदबाहेर टीडीपीने मोदी सरकारविरुद्ध नारेबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अलवर मॉब लिंचिंगप्रकरणावरुन सरकारला जाब विचारला आहे. अलवर जमाव हत्याकांडप्रकरणातील मृत अकबर खानला केवळ 6 किमी अंतरावरील रुग्णालयात दाखल करण्यासाठी 3 तास का लागले असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला.



 

अविश्वास प्रस्तावानंतर आज पुन्हा लोकसभेत खासदारांचा गोंधळ सुरू झाला आहे. संसदेतील राहुल गांधींच्या असभ्य वर्तनाबद्दल सत्ताधिकाऱ्यांकडून राहुल यांना लक्ष्य करण्यात येत आहे. तर, विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र सुरु आहे. टीडीपी खासदारांनी लोकसभा सभागृहाबाहेर सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी जयदेव गल्ला यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे काहीही बदलले नसल्याचे म्हटले. तर विपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सरकारवर टीका करताना, सरकार देशहित नसलेल्या कृत्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे. तसेच काँग्रेस खासदारांनीही बेरोजगारीच्या समस्येवरुन संसदेबाहेर मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, सभागृहात मॉब लिंचिंग, तीन तलाक, आरटीआय संशोधन यांसह आदि विधेयकांवरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे.



 

टीडीपी खासदार



 

Web Title: TDP confusion outside the Parliament, shroud from Mob Linching in the hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.