हैदराबाद : आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मारहाणीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
अनंतपूरमधील ताडीपत्रीमध्ये वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देशम पक्ष (टीडीपी) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एका टीडीपी नेता एस. भास्कर रेड्डी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्यासह 10 जण जखमी झाले आहेत. याशिवाय, राज्यात अनेक ठिकाणी तुंबळ हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतपूर जिल्हातील ताडीपत्री विधानसभा मतदार संघात टीडीपी नेता एस. भास्कर रेड्डी यांच्यावर वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कथितरित्या हल्ला करुन त्यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. या मतदार संघातील देवापुरम या गावी कार्यकर्त्यांनी हाणामारी झाली. यात एस. भास्कर रेड्डी जमखी झाले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
याशिवाय, गुंटूर आणि प्रकाशम जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणानी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाल्याचे समजते. तर, बंदरापल्ली येथील पुथालापट्टूमध्ये वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.