कोलकाता - शिक्षिका आणि तिच्या बहिणीला जमावाकडून दोरीने बांधून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दक्षिण दीनाजपूर जिल्ह्यातील फाटानगर गावात घडली आहे. स्मृतिकोना दास आणि त्यांची मोठी बहीण सोमा दास अशी मारहाण झालेल्या महिलांची नावे आहेत. सदर शिक्षिका आणि तिच्या बहिणीने पंचायतीकडून बांधण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी घरासमोरील अधिकची जागा देण्यास नकार दिल्याने ही मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, माहराण करणाऱ्या जमावाचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसचे नेते अमल सरकार करत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर नेत्याला पक्षातून निलंबित केले आहे. मात्र रविवारी रात्रीपर्यंत कुणाविरोधात अटकेची कारवाई झाली नव्हती. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमा णात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्मृतिकोना दास यांचे पाय दोरीने बांधतान दिसत आहे. तर बाकीचा जमाव त्यांना फरफटत नेत मारहाण करत आहे. त्यानंतर स्मृतिकोना यांची बहिण सोमा दास या त्यांना वाचवण्यासाठी आल्यावर जमावाने त्यांनाही मारहाण केली. दरम्यान दोन्ही महिलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रस्त्यासाठी 12 फूट जागा लागेल असे पंचायतीकडून आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र नंतर रस्त्याची लांबी वाढवून 24 फूट एवढी करण्यात आली. त्यामुळे आमची अधिकची जमीन रस्त्यासाठी गेली असते. म्हणून आम्ही रस्त्याच्या कामास विरोध नोंदवला होता. तसेच शुक्रवारपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला. त्यानंतर आम्हाला मारहाण करण्यात आली, अशी माहिती पीडित महिलांनी सांगितले.
धक्कादायक! शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, माथेफिरू तरुणाचा प्रताप
अकोल्यात गोळीबाराचा थरार ; संपत्तीच्या वादातून वडीलाने केली मुलाची गोळी झाडून हत्या
प्रेमात अडकलेले मामी-भाचा पळाले!दरम्यान, स्मृतिकोना यांनी रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये ग्रामपंचायत उपाध्यक्ष अमल सरकार यांचे नाव आहे. स्मृतिकोना दास ह्या गावातील हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे.