शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

न्यूड व्हिडिओची धमकी देऊन शिक्षकानेच विद्यार्थ्याच्या आईला केले ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 3:54 PM

न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणा-या टयुशन टीचरविरोधात विवाहित महिलेने एफआयआर दाखल केला आहे.

ठळक मुद्देतक्रारदार महिलेला दहावर्षांचा मुलगा असून तिने कमलेश पटेलकडे मुलाला शिकवणी लावली होती.महिलेचा पती मागच्या दहावर्षांपासून सौदी अरेबियामध्ये नोकरीला असून वर्षातून एकदा तो भारतात येतो. 

अहमदाबाद - न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणा-या टयुशन टीचरविरोधात अहमदाबादमध्ये राहणा-या एका महिलेने एफआयआर दाखल केला आहे. कमलेश पटेल असे या शिक्षकाचे नाव आहे. मागच्या दहा महिन्यांपासून तो या महिलेला ब्लॅकमेल करत होता. कमलेश पटेल एकेदिवशी माझ्या घराच्या बाथरुममध्ये घुसला व त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने माझा न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे.  

कमलेश आणि त्याची पत्नी किंतु मला ब्लॅकमेल करत होते. त्यांनी या व्हिडिओची धमकी देऊन माझ्याकडून आतापर्यंत पाच लाख रुपये वसूल केले आहेत असे या तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. तक्रारदार महिलेला दहावर्षांचा मुलगा असून तिने कमलेश पटेलकडे मुलाला शिकवणी लावली होती. महिलेचा पती मागच्या दहावर्षांपासून सौदी अरेबियामध्ये नोकरीला असून वर्षातून एकदा तो भारतात येतो. आधी तक्रारदार महिलेचा मुलगा कमलेशच्या घरी क्लासला जायचा पण नंतर कमलेशच टयुशन घेण्यासाठी महिलेच्या घरी येऊ लागला.

कमलेशसोबत त्याची पत्नीही या महिलेच्या घरी यायची. त्यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले. ते सर्व एकत्र मिळून फिरायलाही बाहेर जायचे असे तपास अधिका-याने सांगितले. मे 2017 मध्ये महिलेचा पती सौदी अरेबियाला निघून गेल्यानंतर कमलेश एकदिवस तिच्या घरी गेला. त्यावेळी ती घरात एकटी होती. त्यावेळी संधी साधून त्याने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. पण आपण तो प्रस्ताव धुडकावून लावला असे महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

अलीकडे पुन्हा कमलेश या महिलेच्या घरात घुसला व जबरदस्तीने तिला खेचून बाथरुममध्ये घेऊन गेला. त्यावेळी त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यामुळे त्याने लगेच तिथून पळ काढला असे महिलेने सांगितले. दुस-या दिवशी पटेल पुन्हा या महिलेच्या घरी आला व त्याने शूट केलेला व्हिडिओ दाखवला आणि महिलेला ब्लॅकमेल करणे सुरु केले. पती सौदी अरेबियाहून परत येईपर्यंत कमलेशने आपल्याकडून पाच लाख रुपये उकळले असे या महिलेने सांगितले. 

फेब्रुवारी महिन्यात नवरा परतल्यानंतर तिने सर्व घडला प्रकार त्याला सांगितला. त्यांनी तडजोडीने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पण बोलणी फिस्कटल्यानंतर त्यांनी कमलेश आणि त्याची पत्नी किंतु विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या कमलेश आणि त्याची पत्नी फरार आहेत.                                   

टॅग्स :Crimeगुन्हाTeacherशिक्षक