रायसेन – कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन या संकटकाळात संपूर्ण देशात शाळा-कॉलेज बंद आहेत. परीक्षा आणि शिक्षण ठप्प आहे. काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे पण ज्या भागात इंटरनेट नाही, सोयीसुविधा नाहीत अशाठिकाणी काहीजण मोठ्या जिद्दीनं तेथील मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता काम करत आहेत.
समाजासाठी असलेलं कर्तव्य ओळखून मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. रायसेनमध्ये अशा एका शिक्षिकाची कहाणी समोर येत आहे ज्याने शाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं सुरु केले आहे. कोण आहेत हे शिक्षक, काय करतात ते त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
रायसेन जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्यासाठी आजही रस्ते नाहीत पण ज्यांच्याकडे इच्छाशक्ती असते त्यांना मार्ग सापडतोच. कोरोना संक्रमण वाढत असल्याने शाळा-कॉलेज बंद आहेत पण शाळा बंद असल्याने मुलांचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी रायसेनमधील शिक्षक धडपड करत आहे. ते बैलगाडीतून शाळेय पुस्तक घेऊन शाळांमध्ये पोहचवत आहेत जेणेकरुन ज्यावेळी शाळा सुरु होतील तेव्हा त्यांना पुस्तक हाती मिळताच पुन्हा शिक्षण तातडीनं सुरु होईल.
ही घटना मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील भोजपूर भागातील आहे. सर्व देशांप्रमाणेच याठिकाणीही शाळा अजूनही येथे बंद आहेत. परंतु शिक्षक नीरज सक्सेना ५ किमी अंतरावर केंद्र इटखेडीची पुस्तके घेऊन सालेगड येथील प्राथमिक शाळेत पोहोचले. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ते नाहीत, त्यात काही रस्ते चिखलाने भरलेले आहेत. पण अशा परिस्थितीतही नीरज सक्सेना यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्याने बैलगाडीत पुस्तके ठेवली आणि स्वत: चालवून शाळेत पोहोचले.
शिक्षक नीरज सक्सेना नेहमीच त्यांच्या प्रयत्नात गुंतलेले असतात. त्यांनी सालेगडच्या या प्राथमिक शाळेचे नूतनीकरण केले आहे. शाळा व्यवस्था आणि स्वच्छता ही खासगी शाळेसारखी आहे. शिक्षक नीरज सक्सेना यांना पर्यावरणाची आवड आहे. त्यामुळे शाळेच्या आजूबाजूला झाडे लावण्यात आली आहेत. मुलांचे ज्ञान आणि सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी झाडांवर फलक लावण्यात आले आहेत. ज्यावर वेगवेगळी माहिती विद्यार्थ्यांना पोहचू शकते. शाळेतील वातावरण प्रसन्न असल्याने कडाक्याची थंडी असो वा ऊन-पाऊस मुलं आनंदाने शिक्षण घेण्यासाठी येतात.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
पाक आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत पाठांतर करा, शाळेचा विद्यार्थ्यांना होमवर्क; पालक संतापले
चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सचा करार होणार; अमेरिकेसह भारताचंही टेन्शन वाढणार
गर्लफ्रेंड, गँगस्टर आणि एन्काऊंटर; मुंबईत घडलेला ‘तो’ गुन्हा ४ वर्षानं पुन्हा चर्चेत, कारण...