विद्यार्थीनीचे मळके कपडे धूत बसला शिक्षक; स्वच्छता दूत म्हणून मिरवायला फोटो पोस्ट केले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 05:03 PM2022-09-26T17:03:44+5:302022-09-26T17:04:06+5:30

मुलगी पाचवीत शिकते. ती शाळेचा मळलेला युनिफॉर्म घालून आली होती. 

teacher sat washing the girl student's dirty clothes; Posted a photo to show as a cleanliness ambassador, but... | विद्यार्थीनीचे मळके कपडे धूत बसला शिक्षक; स्वच्छता दूत म्हणून मिरवायला फोटो पोस्ट केले, पण...

विद्यार्थीनीचे मळके कपडे धूत बसला शिक्षक; स्वच्छता दूत म्हणून मिरवायला फोटो पोस्ट केले, पण...

Next

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पाच वर्षांच्या विद्यार्थीनीचे मळके कपडे उतरवायला लावून शिक्षकाने तिचे कपडे पाण्याने धुतले आहेत. हे कपडे सुकेपर्यंत ती विद्यार्थीनी अर्धनग्न अवस्थेत उभी होती. या शिक्षकाने त्या विद्यार्थीनीचे आणि आपले कपडे धुतानाचे फोटो शिक्षकांच्या ऑफिशिअल ग्रुपवर टाकले. 

ही घटना जयसिहंगर येथील एका सरकारी हायस्कूलची आहे, आरोपी शिक्षकाला सहाय्यक आयुक्त आदिवासी कार्य विभागाकडून निलंबित करण्यात आले आहे. ही आदिवासी मुलगी पाचवीत शिकते. ती शाळेचा मळलेला युनिफॉर्म घालून आली होती. 

यावर शाळेतील एका शिक्षकाने मुलीला कपडे काढायला लावले आणि स्वत: धुण्यास सुरुवात केली. या काळात ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत दोन तास बसून राहिली. ड्रेस सुकल्यानंतर मुलीला वर्गात पाठविण्यात आले. शिक्षकाने स्वत:ला स्वच्छता मित्र असल्याचे सांगत विभागीय गटात तिचे फोटो पोस्ट केले. यामुळे खळबळ उडाली. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. ही बाब समोर येताच आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले. शहडोल जिल्ह्यातील बडा काला गावात ही घटना घडली.

Web Title: teacher sat washing the girl student's dirty clothes; Posted a photo to show as a cleanliness ambassador, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.