शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नेटवर्कसाठी शिक्षकांची रोज झाडावर ‘हजेरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 6:32 AM

‘टू-जी’मुळे खोळंबा : झारखंडमधील गावात घडतो प्रकार

डाल्टनगंज : झारखंडमधील पालमू जिल्ह्यातल्या सोहरी खास या गावी सहा शिक्षक रोज सकाळी आपल्या शाळेच्या अंगणातील पळसाच्या झाडावर चढतात, तेव्हा त्यांच्या हातात बायोमेट्रिक रीडरला जोडलेला टॅब्लेट असतो. त्यावर ते बोटाचा ठसा उमटवून रोज आपली हजेरी लावण्याचा प्रयत्न करतात.इंटरनेटचे कनेक्शन धड मिळत नसल्याने झाडावर चढून ते गवसण्यासाठी शिक्षकांना ही कसरत करावी लागते.

ज्यावेळी इंटरनेट कनेक्शन मिळत नाही त्यावेळी शिक्षक शाळेत ठेवलेल्या हजेरीपत्रकात सही करतात. म्हणजेच एकाच उद्दिष्टासाठी दोन-दोन गोष्टी बाळगाव्या लागतात. सोहरी खास शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, आमच्याकडे २ जी नेटवर्क असून, त्यामुळे इंटरनेट कनेक्ट होताना प्रचंड अडचणी येतात. शिक्षकांची हजेरीसाठी चाललेली धावपळ बघून विद्यार्थ्यांचीही करमणूक होते. राज्याच्या ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची अवस्था खूपच वाईटआहे. झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी २०१७ मध्ये ज्ञानोदय योजनेंतर्गत शाळांना ई-विद्या वाहिनी अ‍ॅप अपलोड केलेले टॅबलेट वितरित केले आहेत. शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी, तसेच मुलांचे प्रवेश, त्यांच्या गळतीचे प्रमाण व अन्य महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग केला जातो.त्याचप्रमाणे शिक्षकांनी केलेली कामगिरी, शाळेच्या झालेल्या तपासणीचा अहवाल आदींची माहिती या अ‍ॅपद्वारे शिक्षणखात्याला कळविली जाते. 

‘असून अडचण, नसून खोळंबा’सरकारने २०१ ते १००० विद्यार्थिसंख्या असलेल्या प्रत्येक शाळेला दोन टॅबलेट दिले आहेत; मात्र ते वापरताना इंटरनेट कनेक्शनला येणाऱ्या अडचणींमुळे झारखंडमधील शिक्षकांची दमछाक होत असून, सरकारने या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशीही मागणी होत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकInternetइंटरनेट