देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभरात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. 1962 मध्ये जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा लोकांनी 5 सप्टेंबर हा दिवस राधाकृष्णन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यास राधाकृष्णन यांनी विरोध दर्शवला. त्याऐवजी 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करू, असा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून सर्वपल्ली राधाकृष्णनं यांच्या जन्मदिनी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो.
यानिमित्तानं जाणून घेऊया त्यांचे अनमोल आणि प्रेरणादायी विचार...
1. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवतो, तो खरा शिक्षक.
2. मानवतेच्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन चांगली व्यवस्था आणि स्वातंत्र्य दोन्ही अबाधित राहील.
3. पुस्तकांच्या वाचनानं आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय आणि खरे सुख लाभते.
4. जो संपूर्ण आयुष्यभर शिकत राहतो तसंच आपल्या विद्यार्थ्यांकडून एखादी गोष्ट शिकण्यासही त्याला कमीपणा येत नाही, तो एक उत्तम शिक्षक असतो.
(... त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होतो 'शिक्षक दिन')
5. जोपर्यंत शिक्षक शिक्षणाच्या प्रति समर्पित आणि प्रतिबद्ध होत नाही, तोपर्यंत शिक्षणाला मोहीमेचे स्वरुप प्राप्त होणार नाही.
6. पुस्तक हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सेतू बांधण्याचं कार्य करू शकतो.
7. कवी धर्मामध्ये कोणत्याही निश्चित स्वरुपातील सिद्धांतासाठी कोणतीही जागा नसते.
(Teachers' Day : गुगलने खास डुडलद्वारे दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा)
8. मानव दानव बनणं, हा त्याचा पराभव... मानव महामानव बनणं, हा त्याचा चमत्कार... आणि मनुष्य मानव होणे, हा त्याचा विजय...
9. कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यत खरे नसते, जोपर्यंत त्या विचाराचं स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. सत्याच्या शोधात असताना कोणत्याही धार्मिक श्रद्धा किंवा राजकीय सिद्धांतांमध्ये बाधा आणू नये.
10. धर्माविना एखादी व्यक्ती लगाम नसलेल्या घोड्याप्रमाणे असतो.