काशेश्वर विद्यालयात शिक्षक दिन
By admin | Published: September 07, 2015 11:27 PM
संगमनेर : कासारा दुमाला येथील काशेश्वर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला.
संगमनेर : कासारा दुमाला येथील काशेश्वर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मेजर लक्ष्मण ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शिक्षक नारायण डहाळे यांनी भूषविले. ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ढोले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंगाचे वर्णन केले. डहाळे यांनी शिक्षक-विद्यार्थी यांचे नाते अतूट असल्याचे सांगितले. उपसरपंच शरद खतोडे, बाळासाहेब वाळके, बी.के.गायकवाड, नारायण शिंदे, खूशी आंबरे व स्नेहल शिंदे यांची मनोगते झाली. याप्रसंगी सरपंच अलका शिंदे, सदस्य सुभाष गुंजाळ, तुळशीराम सातपुते, दिनानाथ नाईक, सुरेखा शिंदे, कविता रूपवते, शिवाजी पोखरकर, अशोक गुंजाळ, प्रकाश जोर्वेकर, चांगदेव वाळके, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक माधव हासे, भाऊसाहेब शेळके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रेखा गाडे यांनी करून अर्जुन वाळके यांनी आभार मानले. (प्रतिनधिी)