Teak timber smuggling : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबतच प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केले आहे. चित्रपटात लाल चंदनाची तस्करी दाखवण्यात आली आहे. अशी अनेक प्रकरणे खऱ्या आयुष्यातही घडताना दिसतात. आता एक ताजे प्रकरण सागवान लाकडाच्या (Teak timber) तस्करीचे समोर आले आहे. फॉरेस्ट अधिकारी आणि पोलिसांनी व्होल्व्हो बसमधून सुरू असलेली तस्करी रोखली.
आयएफएस अधिकाऱ्याचे ट्विट व्हायरल
भारतीय वन सेवा (IFS) अधिकाऱ्याने याबाबत काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना IFS अधिकारी परवीन कासवान म्हणाले, 'काल रात्री 3.30 वाजता कारवाई करण्यात आली. एका व्होल्वो स्लीपर बसचा वापर सागवान लाकडाची तस्करी करण्यासाठी केला जात होता. या 'पुष्पा'ने आम्हाला हलक्यात घेतले. बरं झालं, आता आमच्याकडे डिलक्स बस आहे.'
पोस्ट व्हायरलही बातमी लिहिपर्यंत IFS अधिकाऱ्याच्या पोस्टला 3 हजाराहून अधिक व्ह्यूज आणि 155 रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच, युजर्स या विषयावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले - पुष्पाची पुंगी वाजली. दुसऱ्या युजरने लिहिले - शाब्बास सर, तुमच्या टीमसाठी टाळ्या. तर इतरांनी लिहिले की, पुष्पा पकडली गेली.