नवी दिल्ली : ‘किंगफि शर एअरलाइन्स’साठी घेतलेली ९,५०० कोटी रु पयांची बँक क र्जे बुडवून परागंदा झालेले ‘मद्यसम्राट’ विजय मल्ल्या यांच्या भारतात प्रत्यार्पणाला गती देण्यासाठी सीबीआयच्या तीन आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) दोनअधिक ाऱ्यांचेपथक लंडनमध्येदाखल झाले आहे. हे पथक मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाविषयी स्थानिक अधिक ाऱ्यांशी विचार−विनिमय क रील. सीबीआयचेअतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखालील हे चार सदस्यीय पथक ब्रिटिशअधिक ाऱ्यांना मल्ल्या यांच्याविरु द्धच्या आर्थिक गुन्ह्याची बारीक माहिती देईल. मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा ब्रिटनच्यान्यायालयात असून, यात सीबीआय किंवा ईडी थेट पक्षक ार नाही. भारतीय संघटना मल्ल्या यांनी तेथील न्यायालयात दाखल केलेल्या याचिक ांच्या विरोधात ब्रिटिश सरक ारी वकि लांना मदत क रीत आहेत. मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठीतेथील न्यायालयात भक्क म बाजू मांडण्याच्या उद्देशाने हे पथक पाठविण्यात आलेआहे. मल्ल्या यांचे प्रत्यार्पण क रण्याच्या भारताच्या मागणीनंतर गेल्या महिन्यात ब्रिटिश अधिक ाऱ्यांनी त्यांना अटक के ली होती. मात्र, लंडनमधील न्यायालयानेक ाही तासांतच त्यांची जामिनावर सुटक ा केली. या प्रक रणी १७ मेरोजी सुनावणी होणार आहे. आयडीबीआय बँकेच्या ९०० क ोटी रु पयांच्या क र्जाची परतफेड न केल्याप्रक रणी त्यांना अटक क रण्यात आली होती.
मल्ल्यांना आणण्यासाठी पथक लंडनमध्ये
By admin | Published: May 03, 2017 7:08 AM