भाजपाचे नेते संबित पात्रा टूलकिट प्रकरणी ट्विटर इंडियाच्या कार्यालयामध्ये दिल्ली पोलीस पोहोचले असून तपासणी सुरु आहे. (Team of Delhi Police Special cell carrying out searches in the offices of Twitter India)
भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर टूलकिट प्रकरणी आरोप केले होते. यावरून वादळ उठलेले असताना मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसप्रणित टूलकिट टॅग बनविल्याचा आरोप ट्विटरवर पात्रा यांच्याकडून करण्यात आला होता. याविरोधात दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाला स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठविली आहे.
ही नोटीस देण्य़ासाठी दिल्ली पोलिसांची टीम ट्विटर इंडियाच्या कार्यालयात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही नेहमीची प्रक्रिया आहे, असे सुत्रांनी सांगितले. त्याआधी दिल्ली पोलीस ट्विटर इंडियाच्या कार्यालयात गेल्याने पोलिसांनी छापा टाकल्याचे समजले होते. तसेच तपासणी केल्याचेही बोलले जात आहे. अद्याप ट्विटरकडून यावर कोणताही खुलासा आलेला नाही.
जबबादार अधिकाऱ्याच्या हाती नोटीस देण्यासाठी दिल्ली पोलीस ट्विटरच्या कार्यालय़ात गेल्याचे सांगण्यात येत आहे.