ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे साहजिकच भारतीय क्रिकेट चाहत्यांना दुःख अनावर झालं. या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील भारताच्या पराभवाचं अनेकांनी आपापल्या परीनं विश्लेषण केलं आहे. त्याच प्रमाणे महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही टीम इंडियाच्या पराभवाचं विश्लेषण केलं आहे. टीम इंडियाला अतिआत्मविश्वास नडला, असंही आनंद महिंद्रा ट्विट करत म्हणाले आहेत. भारताचा पराभव झाल्यानंतर दुस-याच दिवशी आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट केलं आहे. सोमवारच्या सकाळ प्रतिबिंब: पाकिस्तान संघानं एखाद्या स्टार्ट अप कंपनीसारखा उत्साह दाखवला आहे. त्यांनाही कदाचित माहिती नसेल की त्यांनी काय साध्य करून दाखवलं आहे. कधी कधी कंपन्यांसारखे किस्से क्रिकेट संघासोबतही घडतात. मोठं यश हा मोठा धोका आहे. विजयाच्या उन्मादात जगणं हासुद्धा एक प्रकारचा आजार आहे, अशा आशयाचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटनं टीम इंडियाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. आनंद महिंद्रांचं हे विश्लेषण एक प्रकारचं पाकिस्तान आणि आपल्या संघांमध्ये समानता दाखवणारं आहे. पूर्वीचं यश हे आपल्याला काही काळच अजिंक्य ठेवते. मात्र याचाही आनंद घेतल्यास तो निष्फळ ठरत नाही. मला आशा आहेत की यातून टीम इंडियानं चांगला धडा घेतला असेल. पाकिस्तान टीमही चांगली खेळण्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असंही आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.
Monday morning reflection: The Pak team had the spirit of a Start-up company. They just didn"t know what was impossible...— anand mahindra (@anandmahindra) June 19, 2017
Sometimes for companies as well as sports teams, great success is the greatest threat. Brings a disease called the "Myth of Invincibility"— anand mahindra (@anandmahindra) June 19, 2017