शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 19:37 IST

अॅक्सिसच्या शेअरमध्ये आलेली उसळी पाहून शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांचीही गाळण उडाली होती. नंतर त्यांनी काही तांत्रिक समस्या उद्भवल्याने शेअरमध्ये एवढी वाढ झाल्याचे कारण सांगितल्याने सर्वांना हायसे वाटले.

आज सकाळी शेअर बाजारात एकच खळबळ उडाली. Axis Nifty ETF च्या शेअरने अचानक 6553 टक्क्यांनी उसळी घेतली तर Axis Gold ETF मध्ये 741 टक्क्यांची वाढ झाली. सकाळी सकाळीच अशा प्रकारे त्सुनामी पाहून भल्याभल्या गुंतवणूकधारकांची भंबेरी उडाली होती. कारण कोणतेही कारण नसताना एवढ्य़ा मोठ्या प्रमाणात शेअरने उसळी घेणे कोड्यात टाकणारे होते. 

अॅक्सिसच्या शेअरमध्ये आलेली उसळी पाहून शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांचीही गाळण उडाली होती. नंतर त्यांनी काही तांत्रिक समस्या उद्भवल्याने शेअरमध्ये एवढी वाढ झाल्याचे कारण सांगितल्याने सर्वांना हायसे वाटले. मात्र, तोपर्यंत काही शेअर धारकांनी यामध्ये हात धुवून घेण्याचाही प्रयत्न केला. Axis Gold ETF हा शेअर 22 जुलैलै 4367 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, 23 जुलैला हा शेअर केवळ 52.35 रुपयांनी दिसत होता. 24 जुलैला जेव्हा बाजार सुरु झाला तेव्हा या शेअरची किंमत 5180 रुपये होती. यामुळे या शेअरमध्ये 6553 टक्क्यांची उसळी दाखविण्यात येत होती. आता बाजार बंद झाल्यानंतर हा शेअर NSE वर 3482 रुपये दिसत आहे. 

तर Axis Nifty ETF चा शेअर 22 जुलैला 1139 वर बंद झाला होता. 23 जुलैला क्लोझिंग व्हॅल्यू 136.80 रुपये दिसत होती. 24 जुलैला या शेअरचा दर 1380 रुपये होता. यामुळे या शेअरमध्ये 741 टक्के उसळी दिसत होती. आज बंद होताना हा शेअर 1151 वर आहे. NSE च्या माहितीनुसार आज Axis Nifty ETF चे 46.53 लाख आणि Axis Gold ETF चे 279 लाख व्यवहार झाले. यापैकी किती शेअर सकाळी 9.50 पर्यंत ट्रेड करण्यात आले याची माहिती मिळालेली नाही. रिटेल गुंतवणूकदारांना या चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. आता त्यांना मोठ्या ETF मध्ये गुंतवणूक करावी लागणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

काय झाला गोंधळ...17 जुलैली एक्सिस गोल्डने घोषणा केल होती की, 24 जुलैला म्यूचुअल फंड विभागाला वेगळे केले जाणार आहे. याचा हिशेब 100 रुपयांच्या बदल्यात 1 रुपया असा होणार होता. तर शेअरची मूळ किंमत विभागली जाणार होती. याचा हिशेब 100 रुपयांना 10 रुपये असा होता. यामुळे सारा घोळ झाल्याचे शेअर बाजाराने जाहीर केले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

चीन एक पाऊल पुढे? कोरोना लसीचा दुसरा टप्पा यशस्वी; लान्सेंटमध्येच प्रसिद्धी

टॅग्स :share marketशेअर बाजार