शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

‘पोर्न साईटस’वरील बंदीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा

By admin | Published: August 13, 2015 2:20 AM

पोर्न साईट्सवर (पोर्नोग्राफी) बंदी घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अशी शिफारस पोर्न वेबसाईट्सवर बंदी घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यसभेच्या

नवी दिल्ली : पोर्न साईट्सवर (पोर्नोग्राफी) बंदी घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अशी शिफारस पोर्न वेबसाईट्सवर बंदी घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यसभेच्या याचिका समितीने केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार भुवनेश्वर कालिता हे या समितीचे अध्यक्ष आहेत.युवा पिढीला पथभ्रष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी अश्लील वेबसाईट्सवर पूर्णत: बंदी घालण्याची मागणी करून जैनाचार्य विजयरत्न सुंदरसुरीजी म. सा. आणि अन्य तीन जणांनी राज्यसभेच्या या समितीला याचिका सादर केली होती. त्यावर राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांचीही स्वाक्षरी आहे.सायबर पोर्नोग्राफीचा समाजावर; प्रामुख्याने मुलांच्या मनावर होणाऱ्या दुष्परिणामांवर या समितीच्या अहवालात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अलीकडच्या काही वर्षांत चाईल्ड पोर्नोग्राफीने वेगाने पाय रोवलेले आहेत आणि आता ती समाजासाठी अत्यंत धोकादायक बनलेली आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन, स्मार्टफोन यांसारख्या उपकरणांच्या माध्यमातून अश्लील साहित्य सहजरीत्या उपलब्ध होत आहे. या अश्लील वेबसाईट्स बालके आणि युवकांच्या मनात नकारात्मकता निर्माण करतात आणि त्यांना सत्कार्य व सद्विचारांपासून दूर नेतात. त्यामुळे या अश्लील वेबसाईट्समध्ये सामाजिक चौकट उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे, असे या अहवालात म्हटले आहे. समितीने आपल्या निष्कर्षाला अंतिम रूप देण्याआधी याचिकाकर्ते, केंद्रीय गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार तंत्रज्ञान (दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित) विभाग, दूरसंचार व शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या (मानव संसाधन विकास मंत्रालय) प्रतिनिधींची बाजू ऐकून घेतली.याचिकाकर्त्यांची मागणीइंटरनेटवर पोर्नोग्राफी दाखविणे हा गुन्हा ठरविणे आणि अशा सामग्रीची निर्मिती व वितरण करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मध्ये दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ही याचिका सादर करणारे जैनाचार्य विजयरत्न सुंदरसुरीजी म. सा. आणि अन्य तीन जणांनी केलेली होती.माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील तरतुदी प्रभावीरीत्या लागू करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेअंतर्गत (एनआयए) सायबर पोलीस दल गठित करणे आणि अश्लील सामग्री उपलब्ध करणारे वितरक व ते बघणाऱ्या लोकांची ओळख पटविण्यासाठी बँकिंग निगरानी प्रणाली स्थापन करण्याची सूचनाही याचिकाकर्त्यांनी केली होती.असा आहे कायदा माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मध्ये पोर्नोग्राफीशी संबंधित गुन्ह्यासाठी किमान ३ ते ७ वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. २००९ मध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती. या कायद्याच्या कलम ६७ मध्ये इलेक्ट्रॉनिक रूपात अश्लील सामग्री प्रसारित केल्यास कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. कलम ६७ (ए) मध्ये लैंगिक अश्लीलतेचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसारण केल्यास कारावास आणि कलम ६७ (बी) मध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी दाखविल्याबद्दल कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. याशिवाय भादंवि १८६० मध्येही पोर्नोग्राफी हा गुन्हा ठरविण्यात आला आहे आणि त्यासाठी दंडाची तरतूद केली आहे.समितीचे सदस्यभुवनेश्वर कालिता (अध्यक्ष), नरेंद्र बुढानिया, ए. नवनीतकृष्णन, अंबेट राजन, रंगासाई रामकृष्ण, व्ही. हनुमंत राव, ए. वी. स्वामी, आलोक तिवारी, लालसिंह वडोदिया आणि के.एन. बालगोपाल. (प्रतिनिधी)अशा आहेत समितीच्या प्रमुख शिफारशी1 ) वेबसाईट्सवर अश्लील आणि आपत्तीजनक सामग्रीच्या प्रसारणाबद्दलच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तटस्थ लोकपाल किंवा तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. या अधिकाऱ्याने अशा वेबसाईट्सवर बंदी घालण्याच्या दिशेने उचित कार्यवाही करावी.2)  इंटरनेटचे जाळे जगभरात पसरले असले तरी तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील सामग्रीच्या प्रसारणावर बंदी घातली जाऊ शकते. अमेरिका, ब्रिटन, आॅस्ट्रेलिया, फ्रांस, संयुक्त अरब अमिरात, चीन आणि सौदी अरब यांसारख्या देशांना इंटरनेटवरील अश्लील सामग्रीच्या प्रसारणाला कायदेशीर आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आळा घालण्यात बरेच यश आलेले आहे. सरकारने या देशांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून भारतात प्रभावी कायदा व तंत्रज्ञानविषयक पाऊल उचलावे.3) सरकारने नि:शुल्क इंटरनेट फिल्टरचे वाटप करावे. त्यामुळे आॅनलाईन पोर्नोग्राफीला आळा घालण्यास मदत होईल. 4) सरकारने अश्लील वेबसाईट्सविरोधात जनजागृती करावी. त्यासाठी बचत गट आणि एनजीओंची मदत घेता येईल. या मोहिमेसाठी सरकारने अर्थसहाय्यही द्यावे. एनजीओ आणि बचत गटांनी इंटरनेटचा वापर करावा. अनेक देशांमध्ये असे करण्यात येत आहे.5)अश्लील सामग्री उपलब्ध करणाऱ्या पोर्नोग्राफी आणि सोशल नेटवर्किंग साईट्सना आपले सर्व्हर भारतात स्थापन करण्यास सांगावे, जेणेकरून संबंधित विभागाला अशा वेबसाईट्सवर दिल्या जाणाऱ्या सामग्रीवर लक्ष ठेवता येईल. संबंधित मंत्रालयांनी या सूचनेवर गांभीर्याने विचार करावा. कारण पोर्नोग्राफी वेबसाईट्सचे सर्व्हर भारतात असल्यास या समस्येवर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण मिळविले जाऊ शकेल.6) केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने शाळा घरांमध्ये आॅनलाईन पोर्नोग्राफीची घुसखोरी रोखण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञानाचे प्रारूप तयार करावे. त्यासाठी शाळा, कॉलेज आणि घरांमध्ये आॅनलाईन झिल्टरचे नि:शुल्क वाटप करावे. याशिवाय पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात यावी.7)  नव्या पिढीला अश्लील वेबसाईट्सपासून वाचविण्यासाठी सर्व संबंधित मंत्रालये आणि संस्थांनी आपसात समन्वय साधण्यासोबतच एक प्रभावी यंत्रणा निर्माण करावी, जेणेकरून इंटरनेट पोर्नोग्राफी; मुख्यत्वे चाईल्ड पोर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले जाऊ शकेल.- सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक संरचना तयार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि सायबर गुन्हे रोखण्याची योजना आखण्यासाठी देशभरात तज्ज्ञांचे गट स्थापन करण्याच्या गृह मंत्रालयाच्या निर्णयाची समितीने प्रशंसा केली आहे. सोबतच तज्ज्ञ गटांच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी वेगाने पावले उचलली जातील, अशी आशाही समितीने व्यक्त केली आहे.