नवी दिल्ली : एक व्यावसायिक घरासमाेर पुतण्या आणि मुलासह फटाके फाेडत असताना दाेघेजण येतात. एकजण त्यांचा चरणस्पर्श करताे आणि काही सेकंदांनी दुसरी व्यक्ती त्यांच्यावर गाेळ्या झाडते. आकाश शर्मा असे या व्यावसायिकाचे नाव आहे. दिल्लीतील शाहदरा परिसरातील फर्श बाजार भागात अज्ञात हल्लेखाेरांनी त्यांची व त्याच्या अल्पवयीन पुतण्यासह गाेळ्या झाडून हत्या केली.
या घटनेत त्याचा १० वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पाेलिसांनी जारी केला आहे. आकाश घरात गेल्यानंतर हल्लेखाेर त्यांच्या थेट छातीत गाेळ्या झाडून पळून जातात. त्यांचा पुतण्या ऋषभ व मुलगा हे दाेघेही त्यांच्यामागे धावतात. मात्र, हल्लेखाेर त्यांच्यावरही गाेळ्या झाडतात.
अल्पवयीन नातेवाइकानेच दिली हत्येची सुपारी - याप्रकरणी पाेलिसांनी आकाश यांच्या एका अल्पवयीन नातेवाइक मुलाला ताब्यात घेतले आहे.- ७० हजार रुपयांवरुन आकाश यांच्याशी असलेल्या वादामुळे त्याने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हे पैसे आकाश परत करीत नव्हते, असे त्याचे म्हणणे आहे.