सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सेटलवाड यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने गुजरात हाय कोर्टाचा निर्णय फिरवला आहे. गुजरात दंगल प्रकरणी खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
१ जुलै रोजी गुजरात हाय कोर्टाने तिस्ता सेटलवाड यांना नियमित जामीन रद्द करुन त्यांना सरेंडर होण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने असं म्हटले की, आरोपपत्र दाखल झाले असल्याने आणि सेटलवाड यांची कोठडीत चौकशी पूर्ण झाली असल्याने त्यांना जामीन देण्यात यावा.
गावाकडच्या महिलेसारखं दिसण्यासाठी केला मेकअप, तिसऱ्याने सीमा पार करुन दिली; IB ने केला मोठा खुलासा
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की, सेटलवाड यांना २ सप्टेंबर २०२२ पासून सतत जामिनावर विचार केला जाईल. त्या कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकणार नाही, असेही सांगितले. न्यायालयाने म्हटले की, जर त्यांनी तसे केले तर फिर्यादी जामीन रद्द करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते.