गुजरातमधील तत्कालीन सरकार पाडण्याच्या कटात तिस्ता सहभागी; अहमद पटेलांकडून घेतले ३० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 05:33 AM2022-07-17T05:33:08+5:302022-07-17T05:34:04+5:30

२००२ च्या जातीय दंग्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार पाडण्याचे मोठे कारस्थान रचले होते.

teesta setalvad involved in the conspiracy to topple the then govt in gujarat 30 lakhs taken from ahmed patel | गुजरातमधील तत्कालीन सरकार पाडण्याच्या कटात तिस्ता सहभागी; अहमद पटेलांकडून घेतले ३० लाख

गुजरातमधील तत्कालीन सरकार पाडण्याच्या कटात तिस्ता सहभागी; अहमद पटेलांकडून घेतले ३० लाख

googlenewsNext

अहमदाबाद : २००२ च्या जातीय दंग्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार पाडण्याचे मोठे कारस्थान रचले होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावरून रचण्यात आलेल्या कारस्थानात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व इतर काही लोक सामील होते, असा दावा गुजरात पोलिसांच्या एसआयटीने अहमदाबादच्या सत्र न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. 

अहमद पटेल हे काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. पटेल यांच्याकडून तिस्ता सेटलवाड यांनी ३० लाख रुपये घेतले होते, असेही एसआयटीने म्हटले आहे. या दाव्यावरून भाजप व काँग्रेसने परस्परांवर जोरदार टीका केली आहे.

एसआयटीने म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील सरकार पाडण्याच्या कटात तिस्ता सेटलवाड, त्या राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार, माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्टदेखील सामील होते. सेटलवाड यांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याकडून एकदा ५ लाख रुपये व दुसऱ्यांदा २५ लाख रुपये घेतले होते. सध्या अटकेत असलेल्या तिस्ता सेटलवाड यांना जामीन देण्यासही एसआयटीने विरोध केला. तिस्ता सेटलवाड यांना एसआयटीने मुंबईतून २५ जून रोजी अटक केली. 

ही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची रणनीती : काँग्रेस

- काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यावर गुजरात सरकारच्या एसआयटीने केलेले आरोप म्हणजे २००२च्या जातीय दंगलीच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या रणनीतीचा भाग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. 

- काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातच्या दंगली रोखण्याची इच्छा व क्षमता नव्हती. त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी यांनी मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली.

- गुजरातच्या एसआयटीने केलेले खोडसाळ आरोप काँग्रेस फेटाळून लावत असल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: teesta setalvad involved in the conspiracy to topple the then govt in gujarat 30 lakhs taken from ahmed patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.