शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Varun Singh Death: हजारो फुटांवरून तेजस खाली कोसळत होते, पण वरुण सिंहांनी कॉकपिट सोडले नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 3:12 PM

Brave IAF Group Captain Varun Singh Lost battel of Life: तो दिवस देखील 8 डिसेंबरच होता, खाली लोकवस्ती होती, समोर मृत्यू दिसत होता, वरुण सिंहांनी कोसळणारे तेजस काही सोडले नव्हते. आजही तोच करिश्मा होईल असे वाटत होते, पण...

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात एकमेव एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. वरुण सिंह यांचे बंगळरुमध्ये उपचारावेळी निधन झाले. याच वरुण सिंहांनी 8 डिसेंबर 2020 मध्ये देखील मृत्यूशी दोन हात केले होते. यंदाही त्यांच्या हेलिकॉप्टरला 8 डिसेंबरलाच अपघात झाला. यामध्ये रावत यांच्यासह 13 जणांचे निधन झाले होते. सिंह एकटे बचावले होते, परंतू आज त्यांची ही झुंज संपली. 

वरुण सिंहांना जेव्हा हेलिकॉप्टरच्या अवशेषांमधून बाहेर काढले तेव्हा ते जिवंत होते परंतू गंभीर जखमी होते. यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बंगळुरुला हलविण्यात आले. रावत यांच्या हेलिकॉप्टरला नेमका कसा अपघात झाला, याची माहिती केवळ वरुण सिंहच देऊ शकत होते. देशाला ते बरे होतील आणि या घटनेची माहिती देतील अशी आशा होती. मात्र, या शूर वीराला वाचविण्यात अपयश आले. 

8 डिसेंबर 2020हेलिकॉप्टर अपघात होण्याच्या बरोबर एक वर्ष आधी वरुण सिंहांनी 8 डिसेंबर 2020 ला मृत्यूला हरविले होते. एवढेच नाही तर देशाची संपत्ती असलेले तेजस लढाऊ विमान आणि त्याच्या दुर्घटनेत होणारी जिवीतहाणी त्यांनी वाचविली होती. वरुण सिंह तेजस विमान चालवत होते. अचानक विमानाच्या कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाला आणि ते विमान हजारो फुटांवरून खाली येऊ लागले. अशा परिस्थितीत पायलटांना कॉकपिटमधून इजेक्ट करण्यास सांगितलेले असते. परंतू वरुण सिंहांनी मृत्यूशी झुंज देण्याचे ठरविले. जरी मृत्यू समोर ठाकला होता तरी त्यांनी कॉकपिट सोडले नाही. लढाऊ विमान लोकवस्तीवर कोसळणार होते. यामुळे अनेकांचे जीव त्यांना दिसले. त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करायचे ठरविले आणि तेजसला हार्ड लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. तेजस जमिनीवर आदळायचे सोडून सुखरुप उतरले. या त्यांच्या धाडसाबद्दल वरुण सिंहांना शोर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. 

हेलिकॉप्टर दुर्घटनेत देखील त्यांनी मृत्यूला झुंजविले, पण अखेर ते ही झुंज हरले. कुटुंबालाही ते या अपघातातून वाचतील अशी आशा होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील दोनदा फोन करून माहिती घेत होते. डॉक्टरांशी बोलत होते. साऱ्या देशाचेही लक्ष लागले होते. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना