शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 9:39 AM

अनेक एक्झिट पोलमध्ये राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बहुमत मिळाल्यास काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करू शकते.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरला मतदान झाले. याचा निकाल आता ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसलातेलंगणात स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. असे असतानाही काँग्रेस हायकमांड अलर्ट मोडमध्ये आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, काँग्रेस तेलंगणात निवडून आलेले आपले आमदार बंगळुरू किंवा इतर कोणत्याही शहरात पाठवण्याचा विचार करत आहे, जेणेकरून घोडेबाजार टाळता येईल. 

२०१४ मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून याठिकाणी बीआरएसची सत्ता आहे. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना राज्यात काँग्रेसच्या विजयाचा विश्वास आहे. मात्र, आमदारांना सध्या इतर ठिकाणी हलवण्याचा पक्षाचा विचार नसून रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. या संदर्भात आणखी एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राज्यात काँग्रेसला जवळपास ७० जागा मिळाल्या आल्या नाहीत, तर आमदारांना बंगळुरू किंवा इतर कोणत्याही शहरात पाठवण्याचा प्रस्ताव आहे. अशा परिस्थितीत या लोकांना इथल्या हॉटेल किंवा रिसॉर्टमध्येही राहता येईल. 

तेलंगणा विधानसभेत एकूण ११९ जागा आहेत. त्याचबरोबर, सरकार स्थापन करण्यासाठी ६० जागांची आवश्यकता आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बहुमत मिळाल्यास काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करू शकते. त्यामुळे विजयानंतर आमदारांना कुठल्यातरी गुप्त ठिकाणी पाठवले जाऊ शकते. तसेच, यामध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे म्हटले जात आहे. 

डीके शिवकुमार बजावणार महत्त्वाची भूमिका याआधीही डीके शिवकुमार यांनी आमदारांना शिफ्ट करण्याची भूमिका बजावली आहे. कर्नाटकमध्ये २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फ्लोर टेस्ट दरम्यान, काँग्रेस आणि जनता दल (एस) च्या आमदारांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले होते. इंडिया टीव्ही सीएनएक्सनुसार, तेलंगणात काँग्रेसला ६३-७९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बीआरएसला ३१-४७, भाजपला २-४ आणि एमआयएमआयएमला ५-७ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Telanganaतेलंगणाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी