शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
3
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
4
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
6
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
7
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
8
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
9
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
10
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
11
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
12
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
13
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
14
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
15
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
16
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
17
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
18
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
19
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
20
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

आता सर्वांच्या नजरा तेलंगणातील निवडणुकीवर, प्रमुख पक्षांचा प्रचार जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 6:31 AM

Telangana Assembly Election 2023: तेलंगणातील जनता गेली ९ वर्षे सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला कंटाळली आहे. राज्यात भाजपची हवा दिसत असून बीआरएसचे सत्तेतून जाणे अटळ आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील सभेत केली.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील मतदान आटोपल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपला मोर्चा तेलंगाणाकडे वळवला आहे. ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.  २ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत.  बीआरएस सरकारचे जाणे अटळ : मोदीकामारेड्डी (तेलंगणा) -  तेलंगणातील जनता गेली ९ वर्षे सत्तेत असलेल्या बीआरएस सरकारला कंटाळली आहे. राज्यात भाजपची हवा दिसत असून बीआरएसचे सत्तेतून जाणे अटळ आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील सभेत केली. पंतप्रधानांनी यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीका केली. प्रचारसभेत मोदी म्हणाले की, जनतेने आमचे काम पाहिले आहे. दिलेले आश्वासन भाजपकडून पूर्ण केले जाते. आम्ही वचन दिले होते तीन तलाख प्रथा संपवून टाकू. पुढे आम्ही ते करून दाखवले. कलम ३७० रद्द करणार, महिलांना आरक्षण देणार याचा शब्द भाजपने दिला होता. आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शनचा शब्द दिला होता. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. मंदिर बांधण्याचे काम आज सुरु आहे. तेलंगणाला दिलेली विविध आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. (वृत्तसंस्था) 

१० वर्षे केवळ भ्रष्टाचार : शाहहैदराबाद : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० वर्षांत केवळ भ्रष्टाचार केला. तेलंगणातील जनता बीआरएस सरकारला सत्तेवरून हटविण्यासाठी सज्ज आहे. आज तरुण, शेतकरी, दलित व मागासवर्गीय लोक पूर्णपणे निराश झाले आहेत. तेलंगणात केवळ भाजपच बदल घडवून आणू शकतो, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे केला. येथे पत्रकारांना संबोधित करताना शाह म्हणाले की, एमआयएम आणि काँग्रेसचा इतिहास दर्शवितो की, दोन्ही पक्षांनी बीआरएसला पाठिंबा दिला होता. जेव्हाही (असदुद्दीन) ओवेसी आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी बीआरएसला पाठिंबा दिला. तसेच निवडून आलेले काँग्रेसचे आमदार बीआरएसमध्ये दाखल झाले. याचा अर्थ, राज्यातील सत्ता परिवर्तनासाठी तुम्ही काँग्रेसला मत दिले तर ते नक्कीच वाया जाईल. (वृत्तसंस्था)

परिवाराकडे मलाई देणारी खाती : राहुलनिजामाबाद : केसीआर यांच्या परिवाराकडे सर्वाधिक कमाई करून देणारी मंत्रालये होती. जमीन, मद्य आणि खाणी यामधून सर्वाधिक पैसा मिळवला जातो. जर तुम्ही भ्रष्टाचारी नव्हता तर ही तिन्ही मंत्रालये तुमच्या परिवाराकडे दिलीच नसती. दलित बंधू योजनेसाठी केसीआर यांचे आमदार तीन लाखांचे कमिशन घेतात, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील प्रचारसभेत केला. ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. २ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. या राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने या खेपेला आक्रमक प्रचार केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शुक्रवारी  प्रचारसभेत आरोप केला होता की, केसीआर यांनी तेलंगणाला लुबाडले आहे. मुख्यमंत्री आता दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही टीका करू लागले आहेत. (वृत्तसंस्था)

पैशांसाठी त्यांना हवी सत्ता : प्रियंकामाधिरा (तेलंगणा) : आपल्या परिवारासाठी गडगंज पैसा कमावण्यासाठी केसीआर यांना काहीही करून सत्तेत राहायचे आहे. निवडणूक जवळ आली की त्यांना जनतेची आठवण होते, अशी टीका काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी माधिरा येथील प्रचारसभेत केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, जनतेने तेलंगणा या राज्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. अनेक घरांतील माता-भगिनींनी राज्यासाठी बलिदान दिले आहे. आज येथील जनता कमालीच्या अडचणींचा सामना करीत आहे. ज्या गोष्टींची आम्ही खात्री देतो, त्यांची आम्ही पूर्तता करतो. तेलंगणात सध्या केवळ नेत्यांच्या फायद्यासाठी राजकारण सुरू आहे. लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. स्वतंत्र भारतातील राजकारणाची परंपरा महात्मा गांधीजींनी सुरू केली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही परंपरा पुढे चालवली. देशाची जनता सर्वतोपरी आहे, अशी आमच्या नेत्यांची धारणा आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती