हैदराबाद - छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विराेधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी पराभूत हाेणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला. तेलंगणातील तुपरान येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते.
पंतप्रधान माेदी म्हणाले की, मी तीन राज्यांमध्ये पाहिले आहे. तिथे ‘इंडिया अलायन्स’चा सुपडा साफ हाेणार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करताना माेदी म्हणाले की, जनतेला भेटत नाही, अशा मुख्यमंत्र्याची राज्याला गरज आहे का? काॅंग्रेस असाे वा बीआरएस, त्यांची ओळख भ्रष्टाचार, घराणेशाही आणि खराब कायदा व सुव्यवस्था, अशी आहे, असे माेदी म्हणाले.
‘बीआरएसला भाजपच पर्याय’- केसीआर हे काॅंग्रेस विचारधारेचे आहेत. काॅंग्रेसला दिलेले प्रत्येक मत थेट बीआरएसला जाईल, असे माेदी म्हणाले.- काॅंग्रेसला दिलेले प्रत्येक मत भ्रष्टाचार, लांगुलचालन आणि घराणेशाही बळकट करेल. बीआरएसच्या सत्तेला केवळ भाजपचाच पर्याय आहे. - केसीआर यांनी राज्यघटना बदलण्याचे वक्तव्य करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याची टीकाही माेदींनी केली.