...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 06:30 IST2023-11-28T06:29:13+5:302023-11-28T06:30:22+5:30
Priyanka Gandhi criticize BRS: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास सरकार ‘फार्म हाऊस’मधून चालविण्यात येईल आणि जमीन व मद्य माफिया राज्य करतील, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यकाळावर केली.

...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र
भाेंगीर - राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास सरकार ‘फार्म हाऊस’मधून चालविण्यात येईल आणि जमीन व मद्य माफिया राज्य करतील, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यकाळावर केली.
भाेंगीर येथील प्रचारसभेत त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या, तेलंगणातील बडे नेते त्यांचे बंगले व फार्म हाऊसमध्ये बसून सरकार चालवत आहेत. गरीब आणखी गरीब हाेत असून बीआरएस पक्ष श्रीमंत हाेत चालला आहे. त्यांची धाेरणे केवळ माेठ्या उद्याेगपतींसाठीच आहे. छाेट्या व्यावसायिकांसाठी, मध्यमवर्गीय, गरीब, दलित तसेच आदिवासींसाठी त्यांच्याकडे काहीच नाही. भाजप असाे किंवा बीआरएस, त्यांचे धाेरण म्हणजे सत्तेत राहणे आणि श्रीमंत हाेणे, हेच असल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली.