शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Telangana Assembly Election Result 2023 : तेलंगणामधील 10 बहुचर्चित जागा; सीएम केसीआर, राजा सिंह आणि ओवेसींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 9:23 AM

Telangana Assembly Election Result 2023 : तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यातील निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच तेलंगणातही रविवारी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यातील निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण भारत राष्ट्र समितीला (BRS) काँग्रेसकडून चुरशीचा सामना करावा लागत आहे. 

एक्झिट पोल सर्व्हेनुसार, तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे. तर बीआरएसला निवडणूक जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागू शकतो. भाजप आणि असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम येथे खेळ बिघडू शकतो. दरम्यान, 30 नोव्हेंबरला 119 सदस्यीय विधानसभेसाठी निवडणूक झाली होती, आता सर्वांच्या नजरा निवडणूक निकालाकडे लागल्या आहेत. राज्यातील 10 हायप्रोफाईल जागांचे निकाल थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी चुरशीची लढत होऊ शकते. तर अशा 10 हाय प्रोफाईल जागांबद्दल जाणून घेऊया...

(मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!)

करीमनगर (Karimnagar Seat)तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील करीमनगर विधानसभा जागा देखील हायप्रोफाईल जागांपैकी एक आहे. येथे बीआरएसने आपल्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री गंगुला कमलाकर यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांना उमेदवारी दिली आहे. संजय सध्या करीमनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2018 मध्येही या दोघांमध्ये लढत झाली होती.

गजवेल (Gajwel Seat)तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील गजवेल ही जागा अतिशय हाय प्रोफाईल जागा आहे. मुख्यमंत्री कालवकुंतला चंद्रशेखर राव (KCR) येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपने आमदार एटेला राजेंद्र यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने टीएन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. 2018 च्या निवडणुकीत सीएम राव यांनी गजबेल जागा जिंकली होती.

गोशामहल (Goshamahal Seat)हैदराबाद जिल्ह्यातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातून भाजपने वादग्रस्त नेते टी राजा सिंह यांना उमेदवारी दिली आहे, तर बीआरएसने नंद किशोर व्यास यांना तिकीट दिले आहे, तर मोगिली सुनीता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. 2018 च्या निवडणुकीत भाजपच्या राजा सिंह यांनी गोशामहल जागा जिंकली होती.

कोरुतला (Korutla Seat)तेलंगणातील कोरुतला विधानसभेच्या जागेवरही कडवी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने निजामाबादमधून खासदार अरविंद धर्मपुरी यांना उमेदवारी दिली आहे, तर बीआरएसने डॉ. संजय कलवकुंतला यांना उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेसने जेएन राव यांना तिकीट दिले आहे. 2018 च्या निवडणुकीत कोरुतला जागा बीआरएसकडे गेली.

जुबली हिल्स (Jubilee hills Seat)भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यावेळी विधानसभा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने त्यांना हैदराबादच्या जुबली हिल्स मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यांच्याविरोधात बीआरएसने गोपीनाथ यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून दीपक रेड्डी रिंगणात आहेत. 2018 च्या निवडणुकीत ज्युबली हिल्सची जागा बीआरएसने जिंकली होती.

कामरेड्डी (Kamareddy Seat)मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे कामरेड्डी जिल्ह्यातील कामरेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, ही राज्याची हाय प्रोफाईल जागा आहे. यंदाच्या निवडणुकीत के चंद्रशेखर राव 2 जागांवर आपले नशीब आजमावत आहेत. कामरेड्डी या जागेशिवाय के चंद्रशेखर राव गजवेल मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. के चंद्रशेखर राव यांच्याविरोधात भाजपने वेंकट रामण्णा रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून ए.व्ही.रेड्डी निवडणूक लढवत आहेत.

सिरिसिल्ला (Sircilla Seat)रंजाना सिरिसिल्ला जिल्ह्यातील सिरिसिल्ला जागा ही राज्यातील हाय प्रोफाईल जागांपैकी एक आहे. तेलंगणाचे उद्योगमंत्री केटी रामाराव निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात भाजपच्या राणी रुद्रमा रेड्डी निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेसने केके महेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. केटी रामाराव हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र आहेत.

सिद्दीपेट (Siddipet Seat)तेलंगणातील सिद्दीपेट मतदारसंघातून बीआरएसने पुन्हा एकदा शक्तिशाली नेते आणि मंत्री तनारू हरीश राव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने श्रीकांत रेड्डी यांना तिकीट दिले तर काँग्रेसचे पी हरिकृष्ण हे कडवे आव्हान देत आहेत. 2018 मध्ये बीआरएसचे हरीश राव येथून विजयी झाले होते.

नरसापूर (Narsapur Seat)बीआरएसच्या सुनीता लक्ष्मी रेड्डी मेडक जिल्ह्यातील नरसापूर मतदारसंघातून रिंगणात आहेत, तर भाजपचे मुरली यादव आणि काँग्रेसचे राजी रेड्डी त्यांना कडवे आव्हान देत आहेत. 2018 च्या निवडणुकीत बीआरएसचे सी मदन रेड्डी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी सुनीता लक्ष्मी रेड्डी यांचा पराभव केला. तेव्हा सुनीता काँग्रेसमध्ये होत्या.

चंद्रायनगुट्टा (Chandrayangutta Seat)असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम)  हैदराबादच्या प्रसिद्ध चंद्रायनगुट्टा मतदारसंघातून अकबरुद्दीन ओवेसी यांना उमेदवारी दिली आहे. तर या मतदारसंघात बीआरएसने एम सीताराम रेड्डी, काँग्रेसने बोया नागेश आणि भाजपने के महेंद्र यांना उमेदवारी दिली आहे. 2018 मध्ये अकबरुद्दीन जिंकले होते.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३TelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक