शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

७०० वाहनांचा ताफा अन् मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन; मात्र तेलंगणातच मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 12:57 PM

Telangana Assembly Election Result: तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसोबतच तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकालही आज येत आहेत. तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीवर आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंतच्या आलेल्या आकडीवारीनूसार, ६७ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. तर बीआरएस ३४ जांगावर आघाडीवर आहे. भाजपा १३ जागांवर तर एमआयएम ४ जागांवर सध्या आघाडीवर आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!

तेलंगणाची स्थापना २०१३मध्ये झाली. त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. केसीआर यांच्या पराभवामागे त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल असल्याचे मानले जाते. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर केसीआर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीबद्दल बोलले होते. २०२४च्या निवडणुकीपूर्वीही ते याच फॉर्म्युल्याखाली विरोधी आघाडी भारतामध्ये सामील झाले नाहीत. ऑक्टोबर २०२२मध्ये, KCR यांनी राष्ट्रीय मंचावर आणण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नाव TRS (तेलंगणा राष्ट्र समिती) बदलून BRS (भारत राष्ट्र समिती) केले.

इतकेच नाही तर तेलंगणाच्या निवडणुकीला वर्षभराहून कमी कालावधी शिल्लक होतं. त्यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजपा राज्यात केसीआरच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात व्यस्त असताना केसीआर ७००-७०० वाहनांच्या ताफ्यासह तेलंगणासोडून महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. यामध्ये संपूर्ण तेलंगणाचं मंत्रिमंडळही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल आणि तेलंगणासोडून इतर राज्यात घालवलेला वेळ केसीआर यांना महागात पडल्याचं निकालावरुन स्पष्ट होत आहे. 

राज्यातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. यावेळी २२९० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गत २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने ११९ पैकी ८२ जागा जिंकत बाजी मारली होती.

टॅग्स :BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावcongressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३