Telangana Assembly Election Results : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:54 AM2018-12-11T11:54:32+5:302018-12-11T12:21:29+5:30
तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. निकालाच्या कलानुसार के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक जागी आघाडीवर आहे.
हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या 119 आहे. त्यामुळे बहुमतासाठी 60 जागा मिळणे आवश्यक आहे. निकालाच्या कलानुसार के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक जागी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे. निकालांचे कल पाहता तेलंगणातील काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.
रेड्डी म्हणालेत की, 'निवडणुकीच्या निकालावर मला शंका आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचाही आरोप उत्तम कुमार रेड्डी यांनी केला आहे. व्हीव्हीपॅट स्लिपचीदेखील पुन्हा मोजणी व्हावी.'
ईव्हीएमबाबत संशय असल्यानं सर्व काँग्रेस नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही रेड्डी यांनी यावेळी सांगितले.
(Telangana Assembly Election Results Live : के.चंद्रशेखर राव यांचा 50,000 मतांनी विजय)
Telangana Pradesh Congress Committee's Uttam Kumar Reddy on #AssemblyElection2018 results: I am having doubts on results we're getting in Telangana ballot paper counting. We're doubting that tampering could have been done in EVMs. Slips should be counted in VVPATs. (File pic) pic.twitter.com/oqGpsaikjf
— ANI (@ANI) December 11, 2018
Telangana Pradesh Congress Committee's Uttam Kumar Reddy: All the Congress leaders will complaint to RO officers. We will also complaint to ECI on this matter. How can TRS leaders say before counting that who will lose in elections. #AssemblyElection2018
— ANI (@ANI) December 11, 2018
टीआरएसच्या खासदार के कविता यांची काँग्रेसच्या आरोपावर प्रतिक्रिया
'निवडणुकीतील प्रत्येक पराभूत पक्ष पराभवाचे खापर ईव्हीएमवरच फोडतो. ही बाब पूर्णतः चुकीची आहे. जनतेनं टीआरएसला विजय मिळवून दिला आहे. काँग्रेस ईव्हीएमबाबत करत असलेला दावा चुकीचा आहे'.
K Kavitha, TRS MP: The losing party always says the EVMs have been tampered with, this is absolutely false. Even the CEC in a press meeting yesterday said that it is not possible to tamper EVMs. People have given victory to TRS, what Congress is claiming is false. pic.twitter.com/tKsvrVdZ0u
— ANI (@ANI) December 11, 2018
Sanjay Raut, Shiv Sena: I won't say these are victories of Congress but this is an anger of the people. Self-reflection is needed #AssemblyElections2018pic.twitter.com/YL1gNECx5a
— ANI (@ANI) December 11, 2018
'छोटे मियां' पाचव्यांदा विधानसभेत....#TelanganaElections#Results2018#AssemblyElections2018https://t.co/EMqQJoGIn4
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 11, 2018
#AssemblyElections2018#TelanganaElections2018 Live : टीआरएस आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर https://t.co/CioKEMnZFw
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 11, 2018