शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

YSRTP विधानसभा निवडणूक लढवणार नाही, या पार्टीला दिला बिनशर्त पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 5:29 PM

शर्मिला यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

वायएसआर तेलंगणा पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. पार्टीच्या प्रमुख शर्मिला यांनी आज ही घोषणा केली. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शर्मिला यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीची 'भ्रष्ट आणि लोकविरोधी राजवट' संपवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. शर्मिला म्हणाल्या की, राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असताना सरकारविरोधी मतांचे विभाजन करून अडसर बनायचे नाही. तसेच, काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल शर्मिला यांनी तेलंगणातील जनतेला माफ करण्याचे आवाहन केले आहे.

तेलंगणाच्या भवितव्यासाठी शर्मिला यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच, राज्यातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा पराभव करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आल्याचे शर्मिला यांनी स्पष्ट केले. याशिवाय, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होणार आहे. तसेच, बदलत्या घडामोडींमुळे काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे शर्मिला यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला बिनशर्त पाठिंबामिळालेल्या माहितीनुसार,  वायएसआर तेलंगणा पार्टीने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत आहे. शर्मिला यांनी वायएसआर तेलंगणा पार्टीने कार्यकर्त्यांना तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले.

राज्यात ३० नोव्हेंबरला होणार मतदान तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राज्यात मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :Telanganaतेलंगणाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेस