Telangana Politics : काँग्रेसशासिततेलंगणा विधानसभेत आज एक अनोखे दृष्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revath Reddy) यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांना थेट उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. यामुळे उपस्थितांच्या भूवया उंचावल्या. पण, रेड्डी यांनी ओवेसींसमोर एक अटही ठेवली.
आज तेलंगणा विधानसभेत हैदराबाद ओल्ड सिटीचा विकास, मेट्रो कनेक्टिव्हिटी, कायदा व सुव्यवस्था, वक्फ मालमत्ता आणि निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा सुरू होती. यावेळी सीएम रेड्डी म्हणाले, "माझ्या मित्राने(ओवेसी) त्यांच्या जुन्या मित्राला(माजी मुख्यमंत्री केसीआर) 10 वर्षे दिली. मी फक्त चार वर्षे मागतो. ओल्ड सिटीचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे. त्या ठिकाणी मेट्रोचा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर, मी त्याच मेट्रोमधून मते मागायला येईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
ओवेसींना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर यावेळी रेवंत रेड्डी यांनी चंद्रयानगुट्टा मतदारसंघाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी पाठिंबा मागितला. रेड्डी म्हणाले, "ओवेसींनी चंद्रयांगुट्टामधून काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावे आणि स्वतः काँग्रेसच्या तिकिटावर कोडंगलमधून निवडणूक लढवावी. त्यांच्या विजयाची जबाबदारी मी घेतो आणि त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या शेजारी बसवतो. ते तयार असतील, तर मी माझ्या कोडंगलची जागा त्यांना द्यायला तयार आहे."
ओवेसी काय म्हणाले..?या ऑफरला उत्तर देताना अकबरुद्दीन ओवेसी हसत हसत म्हणाले की, माझा राजकीय प्रवास AIMIM पासून सुरू झाला, AIMIM मध्ये वाढला आणि AIMIM मध्येच संपेल.