आदेश रावल नवी दिल्ली : तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेस कुठेच चर्चेत नव्हती. परंतु, आता राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकते, असे काँग्रेस पक्ष व नेतृत्वाला वाटू लागले आहे. पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यात तीन ते पाच दिवस प्रचार करावा, अशी विनंती तेलंगणा काँग्रेसने केली आहे. त्या तेलंगणामध्ये ‘सोनिया अम्मा’ नावानेही प्रसिद्ध आहेत.
सोनिया गांधी यांनी जेथून स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीची घोषणा केली होती, त्याच राज्यात त्यांनी पुन्हा एकदा जनतेला आवाहन करावे व प्रामुख्याने ग्रामीण भागाचा दौरा करावा, असे नेत्यांना वाटते.
nपाच राज्यांतील निवडणुका असोत किंवा कर्नाटक, हिमाचल प्रदेशच्या निवडणुका असोत, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी एकही रॅली घेतलेली नाही. nपरंतु काँग्रेस नेतृत्वाला वाटते की, तेलंगणा जिंकणे काँग्रेससाठी फार महत्त्वाचे आहे. यामुळे सोनिया गांधी तीन ते पाच दिवस तेलंगणामध्ये जाऊ शकतात. nसध्या त्या मागील काही दिवसांपासून जयपूरमध्ये आहेत. दिल्लीत प्रदूषण वाढल्यामुळे त्यांनी दिल्लीत राहू नये, असा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला होता.