हैदराबाद : तेलंगणामधील एका डॉक्टरची मुलाला जन्म दिल्यानंतर एका आठवड्यातच कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. हैद्राबादमधील जुन्या शहरातील प्रिंसेस एसरा हॉस्पिटलमधील 31 वर्षीय डॉक्टर फराह निलोफरचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. गजवेलमधील सरकारी हॉस्पिटलमधील डॉ. फराह या कोरोना साथीच्या काळात काम करत होत्या. तसेच, आपल्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनंतरही त्यांनी प्रसूती रजेचा लाभ घेतला नाही. मात्र, अखेर आई बनल्यानंतर आठवड्यातच त्यांचा कोरोनामुळे अंत झाला.
आपल्या समर्पणासाठी परिचित असलेल्या डॉ. फराह बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) काम करत होत्या आणि कोविड लसीकरण कर्तव्यावरही होत्या. जवळपास 10 दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. फराह यांनी शादान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस केले आणि हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलममधून बालरोगशास्त्रात ( पीडियाट्रिक्स) एमडी केले होते.
(Corona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने राहू शकतात अँटीबॉडीज? वाचा सविस्तर)
तीन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर ठेवले होतेगजवेलमधील एरिया हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल एसोसिएट म्हणून तैनात होत्या. कोरोनामुळे तरुण डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वारंगलमधील काकतीय मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक हेमा बिंदू यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. फराह यांचे कोरोनामुळे निधन झाले. तीन दिवसांपूर्वीच त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते.
तेलंगाणामध्ये कोरोनामुळे २१ डॉक्टरांचा मृत्यूहेमा बिंदू म्हणाल्या की, ' डॉ. फराह एक अतिशय हुशार, गतिशील व उत्साही डॉक्टर आणि खूप समर्पित बालरोग तज्ज्ञ होत्या.' तेलंगणाने कोरोना साथीच्या दुसर्या लाटेत आतापर्यंत २१ डॉक्टर गमावले आहेत. दरम्यान, तेलंगणाच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारणांसाठी काम करणारी संस्था हेल्थकेअर रिफॉर्म्स डॉक्टर्स असोसिएशनने कर्तव्यावर असताना कोरोनामुळे बळी पडलेल्या सर्व आरोग्य कर्मचार्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.
(Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...)