शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

बापरे! महिलेच्या पोटातून काढली 8 किलोची गाठ, डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 5:28 PM

Doctors Remove 8-kg Tumour From Woman's Stomach : शशिरेखा असे या शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव असून त्या वर्षभरापासून पोटदुखीने त्रस्त होत्या.

हैदराबाद : तेलंगणातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्मीळ शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून 8 किलोची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. शशिरेखा असे या शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव असून त्या वर्षभरापासून पोटदुखीने त्रस्त होत्या. श्री स्वाती हॉस्पिटलच्याडॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून शशिरेखा यांचे प्राण वाचवले. पोन्नेबोयना श्रीनिवास आणि त्यांची पत्नी शशिरेखा हे तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 

शशिरेखा यांना अनेक दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता, त्यांनी जवळच्या काही हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतले, पण त्यांना पोट दुखण्यापासून आराम मिळाला नाही. यानंतर वैतागलेले हे जोडपे सूर्यापेठ येथील श्री स्वाती या खाजगी हॉस्पिटल उपचारासाठी आले. याठिकाणी शशिरेखा यांचे स्कॅनिंग केले. यावेळी त्यांच्या पोटात गाठ (ट्यूमर) असल्याचे निदान झाले. यानंतर ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जवळपास तासभर चाललेल्या शशिरेखा यांच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांना खूप संघर्ष करावा लागला. अखेर त्यांच्या पोटातून 7-8 किलो वजनाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले. या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला पोटदुखीपासून खूप आराम मिळत आहे, असे शशिरेखा यांनी सांगितले. तसेच, शस्त्रक्रियेबद्दल शशिरेखा आणि तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. यासोबतच त्यांनी पॅरामेडिकल स्टाफ आणि या खासगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचेही आभार मानले आहेत. 

याचबरोबर, ही एक अत्यंत दुर्मीळ शस्त्रक्रिया होती, जी इतर कोणत्याही ठिकाणी करणे शक्य नाही, असे डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सांगितले.  दरम्यान, आपली वैद्यकीय व्यवस्था एवढी प्रगत झाली आहे की, येथे नेहमीच कोणत्या ना कोणत्या शस्त्रक्रिया किंवा उपचार केले जातात. उदाहरणार्थ, गेल्या महिन्यात चेन्नईतील डॉक्टरांनी एका मधुमेही महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पित्ताशयातील 1,200 खडे काढले होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर