५०० रूपयांत गॅस सिलिंडर, मोफत वीज अन् लग्नात सोनं आणि रक्कम; तेलंगणात काँग्रेसचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 05:43 PM2023-11-17T17:43:21+5:302023-11-17T17:43:39+5:30

तेलंगणा विधानभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहेत.

Telangana Election 2023 Congress has released its manifesto on Friday and Mallikarjun Kharge has criticized the ruling BJP | ५०० रूपयांत गॅस सिलिंडर, मोफत वीज अन् लग्नात सोनं आणि रक्कम; तेलंगणात काँग्रेसचं आश्वासन

५०० रूपयांत गॅस सिलिंडर, मोफत वीज अन् लग्नात सोनं आणि रक्कम; तेलंगणात काँग्रेसचं आश्वासन

Telangana Election 2023 Date : तेलंगणा विधानभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेतेमंडळी राज्यभर दौरा करत असून घोषणांचा पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जनतेचा कौल आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ५०० रुपयांना एलपीजी सिलिंडर, मोफत वीज आणि मुलींच्या लग्नात सोने आणि रोख रक्कम देण्याची आश्वासने दिली आहेत. 

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी तेलंगणा वेगळे राज्य करण्याबाबत काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या भूमिकेचा देखील उल्लेख केला. "तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर खुर्चीवर कोण बसले, ज्याची काहीच भूमिका नव्हती. किती लोकांना गोळ्या लागल्या, किती लोक मृत्यृमुखी पडले. याचा फायदा जनतेला झाला नाही. राज्य निर्मितीचा फायदा सामान्य जनतेऐवजी खाणकाम आणि शेतीकऱ्यांना लुटणाऱ्या लोकांनाच झाला. यासाठी तेलंगणा नवीन राज्य करण्यात आले का?", असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी नमूद केले.  

खर्गेंचा भाजपावर हल्लाबोल
सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी राम मंदिरावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. कर्नाटक निवडणुकीचा दाखला देताना खर्गेंनी म्हटले, "आम्ही ज्या पद्धतीने कर्नाटकातील जनतेला ५ आश्वासने दिली त्याच पद्धतीने तेलंगणातील जनतेला आम्ही आश्वासने देत आहोत. जी लोक प्रभू श्री राम यांच्या नावाने मतं मागत आहेत, त्यांनी जनतेसाठी काहीच केले नाही. काँग्रेस महिलांसाठी मोफत बस सुविधा पुरवणार आहे. बसमध्ये मोफत प्रवास करून महिलांना दररोज मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल."

तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसची आश्वासने 

  • गॅस सिलिंडर ५०० रूपयांत देणार. 
  • महिलांना बसमध्ये मोफत प्रवास.
  • २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन.
  • इंदिराम्मा उपहार योजनेअंतर्गत हिंदूंना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी सरकारकडून १ लाख रुपये आणि १० ग्रॅम सोने दिले जाईल. त्याचबरोबर अल्पसंख्याकांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी १ लाख ६० हजार रुपये दिले जातील.
  • उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीला मोफत स्कूटी देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले. 

 

Web Title: Telangana Election 2023 Congress has released its manifesto on Friday and Mallikarjun Kharge has criticized the ruling BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.