Telangana Election 2023: भारतीय जनता पक्षाने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने पहिल्या यादीत एकूण 52 उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश-राजस्थानप्रमाणे पक्षाने तेंलगणातही भाजपच्या तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे. करीमनगरमधून खा. बंदी संजय कुमार निवडणूक लढवतील. तर, एटाला राजेंद्र यांना हुजूराबाद आणि गजवेल, या दोन जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे.
निलंबित टी राजा यांनाही उमेदवारीप्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार टी राजा सिंह यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. ते पुन्हा गोशामहल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तसेच, तेलंगणाचे आयटी मंत्री आणि सीएम केसीआर यांचे पुत्र केटीआर, यांच्या विरोधात भाजपने सिरिल्ला मतदारसंघातून राणी रुद्रमा रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
तीन खासदारां उमेदवारीभाजपने माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांना करीमनगरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय, खासदार सोयाम बापू आणि कोरुतलाचे खासदार अरविंद धर्मपुरी, यांनाही पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. यापूर्वी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने असाच प्रयोग करून अनेक विद्यमान खासदारांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपचे आमदार एटाला राजेंद्र गजवेल मतदारसंघातून सीएम केसीआर यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत 12 महिला उमेदवारभाजपच्या पहिल्या यादीत 12 महिला उमेदवारही आहेत. टीडीपीच्या माजी आमदार अन्नपूर्णम्मा यांना बालकोंडा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदूपतला जंगा रेड्डी यांची सून चंदूपातला कीर्ती रेड्डी, यांना भूपालपल्लीची उमेदावरी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी, पक्षाचे राज्य निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर आणि भाजप तेलंगणा प्रभारी सुनील बन्सल यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी फोनवरुन निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. या उमेदवारांना आपापल्या भागात तयारीला लागण्यास सांगितले आहे.