काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला; तेलंगणात उलटफेर होण्याची शक्यता, बीआरएस पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:13 AM2023-12-03T10:13:07+5:302023-12-03T10:21:15+5:30
Telangana Election 2023 Result: तेलंगणात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. भाजपा आणि काँग्रेसची थेट बीआरएससोबत लढत आहे.
तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर असून बीआरएस ४२ जागांवर आघाडी घेत आहे. भाजपा ८ आणि एमआयएम २ जागांवर सध्या पुढे असल्याचे दिसून येत आहे.
#WATCH | Celebrations at Telangana Congress office in Hyderabad as early trends show lead on 47 seats for the party; party cadre chant "Bye. bye KCR"
— ANI (@ANI) December 3, 2023
BRS leading on 26 seats in early trends, as per ECI. pic.twitter.com/vyhCSqifJH
तेलंगणात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. भाजपा आणि काँग्रेसची थेट बीआरएससोबत लढत आहे. तेलंगणातील जनतेने सत्तेच्या चाव्या कोणाकडे सोपवल्या याचा निर्णय आज होणार आहे. राज्यातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. यावेळी २२९० उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
तेलंगणात आम्ही पुन्हा जिंकू - के. कविता
आम्ही चांगलं काम केलंय, तेलंगणातील लोकांच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू, असा विश्वास तेलंगणातील बीआरएसच्या आमदार आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी व्यक्त केला आहे.
#WATCH | On counting day, BRS MLC K Kavitha says, "We are very confident that we will win again with the blessings of the people of Telangana." pic.twitter.com/SQPYtBev1w
— ANI (@ANI) December 3, 2023
२०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. गत २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने ११९ पैकी ८२ जागा जिंकत बाजी मारली होती. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी असून बदलात्मक निकाल समोर येण्याची शक्यता आहे.