Telangana Election 2023: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणातनिवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (10 ऑक्टोबर) त्यांनी राज्यातील आदिलाबाद येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसचा उल्लेख करत विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.
विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवर टीका करताना अमित शहा म्हणाले, "निवडणुका जवळ आल्या की, काँग्रेसचे लोक नवीन कपडे घालून येतात. मला राहुलबाबांना विचारायचे आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार असताना आदिवासी कल्याणासाठी 2013-14 मध्ये 24 हजार कोटी रुपयांचे बजेट होते. ते बजेट आम्ही 2023-24 मध्ये 1 लाख 24 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवले.'
काय म्हणाले अमित शहा?शह पुढे म्हणाले की, 'इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आणि सीएम केसीआर काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा विरोध करता. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनला आहे. केसीआर यांनी गरीब, दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी काहीच काम केले नाही. त्यांनी 10 वर्षात, आपला मुलगा केटी रामाराव यांना मुख्यमंत्री कसे बनवता येईल, यावरच काम केले.'