हैदराबाद - तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने विधानसभेच्या 88 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर, तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी शपथ घेतली. तर, अली यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र, राव यांच्या आमदारांसह एकूण विजयी आमदारांमध्ये 43 आमदार पदवीधर, 26 आमदार पदव्युत्तर तर 27 आमदार डिप्लोमा होल्डर किंवा बारावी पास आहेत.
तेलंगणा विधानसभेतील नवनियुक्त 119 आमदारांपैकी 58 टक्के आमदार पदवीधर आहेत. आपल्या शपथपत्रावेळी त्यांनी दिलेल्या माहितीवरुन याबाबतचा खुलासा झाला आहे. तेलंगणातील 119 आमदारांपैकी 43 आमदार पदवीधर, 26 पदव्युत्तर, 2 पीएचडी होल्डर तर 27 जण डिप्लोमाधारक किंवा बारावी पास आहेत. त्यापैकी 11 जणांकडे एलएलबीची पदवी आहे. 9 जण इंजिनिअर पदवीधारक आहेत. तर 5 जण डॉक्टर आहेत. जगटीयाल येथून डॉ. एम.संजय कुमार विजयी झाले आहेत. तर, विकाराबाद येथून डॉ. आनंद मेथुका आमदार बनले आहेत. वेमुलवाडा येथून चेन्नामनेनी रमेश आणि थुंगाथर्थी येथून गदरी किशोर हे पीएचडी पदवीधारक आहेत. विशेष म्हणजे या यादीतील बहुतांश आमदार हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहेत. त्यामध्ये उस्मानीया विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, ककाटीया, गलुबर्गा विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापीठांचा समावेश आहे.
तेलंगणातील0 आमदारांचे शिक्षण हे त्यांच्या राज्याचा शैक्षणिक दर्जा दर्शवणारे असून राष्ट्रीय राजकारणात प्रभाव टाकणारे आहे. विशेष म्हणजे, तेलंगणातील या सुशिक्षत आमदारांची संख्या ही गोवा, केरळ अन् गुजरात य विकसीत राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. तर, या उच्चशिक्षित आमदारांमध्ये ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची संख्या तुलनेने अधिक आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असून ते उस्मानीया विद्यापीठातूुन तेलुगू साहित्याचे पदवीधर आहेत.