तेलंगणा – कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी नुकताच सत्तारुढ तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षात प्रवेश केला होता. या प्रकरणी कॉंग्रेसने तेलंगणा उच्च न्यायालयात आमदारांच्या पक्षांताराबाबत याचिका दाखल केली होती. यावरून न्यायालयाने त्या 12 आमदारांना नोटीस बजावली असून याबाबत खुलासा देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहे.
तेलंगणामधील कॉंग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी टीआरएसत प्रवेश केला होता. त्यानंतर कॉंग्रेसची मोठी अडचण वाढली असल्याचे पहायला मिळाले . या प्रकरणी काँग्रेसने तेलंगणा उच्च न्यायालयात आमदारांच्या पक्षांताराबाबत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याची गंभीरपणे दखल घेतली असून, तेलंगणा उच्च न्यायालयाने या 12 आमदारांना नोटीस बजाविली आहे. तसेच याबाबत चार आठवड्यामध्ये खुलासा देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने याप्रकरणी तेलंगणा विधानसभेच्या सभापतींसह अध्यक्ष, सचिव आणि निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांनी 6 जून रोजी तेलंगणा विधानसभा अध्यक्षांची भेट घेवून टीआरएस पक्षात प्रवेश करण्याची विनंती करत पक्षांतर केले होते. या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती.