दक्षिणेत चौथ्या आघाडीचे बिगुल वाजवण्याची शक्यता आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव(KCR) यांनी बुधवारी तेलंगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या जाहीर सभेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान(Bhagwant Mann), केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन(Pinrai Vijayan), समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव(Akhilesh Yadav) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केडी राजा(KD Raja) यांचा सहभाग असेल.
यामुळे चौथी आघाडी म्हटले जात आहे...ही जाहीर सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. तेलंगणा राष्ट्र समितीने नाव बदलून बीआरएस केल्यानंतर ही पहिलीच जाहीर सभा आहे. यासोबतच विविध विरोधी पक्ष BRS, आम आदमी पार्टी (AAP), समाजवादी पार्टी (SP) आणि डाव्या पक्षांचे नेते एकत्र दिसणार आहेत. याला चौथी आघाडी म्हणण्यामागे एक खास कारण आहे. पहिली आघाडी म्हणून भाजपकडे पाहिले जाते. दुसरी आघाडी म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. तिसरी आघाडी म्हणून नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जात आहे. या तिन्ही आघाडींपासून अंतर ठेवून केसीआर चौथी आघाडी स्थापन करण्याचे संकेत देत आहेत.
सर्व नेते सभेपूर्वी मंदिरात जाणारबीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि इतर नेते बुधवारी खम्ममला रवाना होण्यापूर्वी हैदराबादजवळील यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला भेट देतील. या मंदिराचा नुकताच सरकारने मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार केला आहे. वरिष्ठ बीआरएस नेते आणि माजी खासदार बी विनोद कुमार यांनी मंगळवारी सांगितले की, नेते हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये तेलंगणा सरकारचा नेत्र तपासणी कार्यक्रम 'कांती वेलुगु' च्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. भाजप-एनडीए सरकारच्या काळात धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि उदारमतवादासह संविधानाचा आत्मा धुळीस मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, देशात पर्यायी राजकारण आणण्यासाठी बीआरएस प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.