तेलंगणाः कोरोनानं भारतात हाहाकार माजवलेला असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. विशेष म्हणजे कोरोनानं मृत्यू झालेल्यांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनानं झालाय हे सिद्ध होत नाही. त्याचा रिपोर्ट येणं बाकी असतं, अशा वेळी त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाड कपड्यात घट्ट गुंडाळून दिला जातो. जेणेकरून जरी तो संक्रमित असला तरी इतरांना त्याचा संसर्ग होऊ नये. तेलंगणाच्या सांगारेड्डी येथेसुद्धा असाच एक प्रकार समोर आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या 25 पैकी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. हे लोक 10 जून रोजी सांगारेड्डीच्या जहिराबाद येथे एका महिलेच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते.कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर शनिवारी या लोकांची तपासणी केली गेली, त्यानंतर त्यातील 19 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. या सर्वांना हैदराबादच्या गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही महिला झहिराबादच्या शांतीनगर कॉलनीत राहत होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. जेव्हा महिलेची कोरोना टेस्ट झाली, तेव्हा ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली.मृत्यूनंतर आला महिलेचा कोरोना रिपोर्ट55 वर्षीय महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचा कोरोनासाठी नमुना 9 जून रोजी घेण्यात आला, रिपोर्ट येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या प्रशासनाने निष्काळजीपणाने कोरोना रिपोर्टची वाट न पाहता महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबातील सदस्यांना दिला. महिलेच्या नातेवाईकांनी पारंपरिक विधी पाळत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.शांतीनगर कंटेन्मेंट झोन केला घोषित या महिलेच्या कोरोना रिपोर्टनंतर शांतीनगरमधील लोक घाबरले आहेत. प्रशासनाने शांतीनगरला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले असून, 350 घरांमध्ये चाचणी घेण्यात येत आहे. प्रशासन या घरांमध्ये स्वच्छताही करीत आहे.सांगारेड्डीत कोरोना विषाणूची 25 प्रकरणेशनिवारी सांगारेड्डीत कोरोना विषाणूची 25 प्रकरणे आढळली आहेत. शनिवारी तेलंगणामध्ये कोरोना विषाणूचे 253 रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकाच दिवसात कोरोना संसर्ग होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. हैदराबादमध्ये कोरोना विषाणूच्या 179 घटना घडल्या आहेत.
हेही वाचा
कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!
'या' कठीण काळात भगवद्गीतेमध्ये शोधा शक्ती अन् शांती : तुलसी गबार्ड
CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित
CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन