निजामाबाद:तेलंगणातीलनिजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी कलम 144 लागू केली आहे. निजामाबादचे सीपी केआर नागराजू यांनी ही माहिती दिली.
पुतळा बसवण्यावरुन गदारोळनिजामाबादचे सीपी केआर नागराजू यांनी सांगितल्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येत होता. याला काही लोकांनी विरोध केला याविरोधात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन भाजप, MIM आणि TRSच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळा हाणामारी आणि दगडफेक झाली. भाजपचे स्थानिक खासदार अरविंद धर्मपुरी यांनी सांगितले की, बोधन नगरपरिषदेने शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानुसार, शहरातील बी.आर.आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची त्यांची योजना होती. परंतु AIMIM आणि TRSने याला कडाडून विरोध केला आणि दगडफेक केली. तसेच, महाराजांचा पुतळा बसवल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची धमकीही दिली आहे.