नवी दिल्ली - तेलंगणातील श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटला गुरुवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीनंतर रेस्क्यू आपरेशन सुरु आहे. आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले. या प्लांटमध्ये ९ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अद्याप तिघांचा शोध सुरु आहे.
तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटला आग लागली. या आगीमुळे पॉवर प्लांटच्या युनिट स्फोट झाले. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही आग लागली. यावेळी काही कर्मचारी देखील तेथे उपस्थित होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.
तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी हे बचाव कार्यात लक्ष ठेवून आहेत. यामधून दहा जणांची सुटका करण्यात यश आले आहे. भीषण आगीमुळे स्फोट देखील झाले आहेत. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. बचावकार्यासाठी एनडीआरएफची देखील मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात, तामिळनाडूच्या नेवेली येथे शासकीय वीजनिर्मिती केंद्रावर बॉयलरचा स्फोट होऊन पाच मजुरांचा मृत्यू झाला होता, तर १६ जण जखमी झाले होते.
आणखी बातम्या...
आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच
१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका
मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!
जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन