शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तेलंगणाचे संक्षिप्त नाव बदलले, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:09 AM

२०१४ मध्ये तेलंगणाच्या निर्मितीनंतर तत्कालीन टीआरएस सरकारने राज्याचे संक्षिप्त नाव म्हणून 'टीएस' निवडले होते.

Telangana  : (Marathi News) तेलंगणा सरकारने रविवारी राज्याचे संक्षिप्त नाव 'टीएस' वरून 'टीजी' करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या राजपत्रात 'टीएस'ऐवजी 'टीजी' वापरले जाणार आहे. २०१४ मध्ये तेलंगणाच्या निर्मितीनंतर तत्कालीन टीआरएस सरकारने राज्याचे संक्षिप्त नाव म्हणून 'टीएस' निवडले होते.

मागील सरकारने कोणतेही नियम पाळले नाहीत आणि टीआरएसशी मिळते-जुळते आपल्या इच्छेनुसार राज्याचे संक्षिप्त नाव 'टीएस' ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, या निर्णयानंतर वाहन नोंदणी क्रमांकावर आता 'टीजी' हा उपसर्ग असणार आहे. याचबरोबर, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान रेवंत रेड्डी यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. 

नवीन राज्य चिन्हाची डिझाइन करण्याचा निर्णयतेलंगणातील लोकांच्या भावना प्रतिबिंबित करण्यासाठी तेलंगणा तल्ली प्रतिमा बदलण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. तसेच, 'जय जय हो तेलंगणा' हे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, सर्व हितधारकांशी सल्लामसलत करून नवीन राज्य चिन्हाची डिझाइन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. राज्य विधानसभेचे अधिवेशन ८ फेब्रुवारीपासून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. यामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाला मान्यता देण्यात आली.

आणखी दोन गॅरंटी लागू करण्याचा निर्णयविधानसभेत चर्चा झाल्यानंतर आणखी दोन गॅरंटी लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ५०० रुपयांचा गॅस सिलिंडर आणि घरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज, अशा दोन गॅरंटी आहेत. तसेच, राज्यात जात जनगणना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. कोडंगल क्षेत्र विकास प्राधिकरणाला अधिसूचित करणे, ६५ सरकारी आयटीआयला प्रगत तंत्रज्ञान केंद्रे म्हणून श्रेणीसुधारित करणे, उच्च न्यायालयाच्या बांधकामासाठी १०० एकर जमीन वाटप करणे आणि दोषींना माफी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे हे इतर प्रमुख निर्णय होते.

टॅग्स :Telanganaतेलंगणा